Covid-19 third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० टक्के मृत्यू लसीकरण न झालेल्यांचेच

Covid-19 third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० टक्के मृत्यू लसीकरण न झालेल्यांचेच

Covid-19 third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० टक्के मृत्यू लसीकरण न झालेल्यांचेच

कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबायचे नाव घेत नाही. अशातच कोरोनाची नवनवीन लाट आणि व्हेरिएंट येत आहेत. यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये ६० टक्के मृत्यू लसीकरण न झालेल्यांचे आणि एक डोस घेतलेल्यांचे झाले आहे, असे एका खासगी रुग्णाच्या नव्या अभ्यासातून समोर आले आहे. मॅक्स हेल्थकेअरच्या अभ्यासानुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक ७० वयोगटातील लोकांचा समावेश होता आणि त्यांच्यामध्ये मधुमेह, कॅन्सर, किडनी आणि हृदयासंबंधित आजार होते.

रुग्णालयाद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासात पुढे म्हटले आहे की, मॅक्स रुग्णालयात आतापर्यंत जवळपास ८२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामधील ६० टक्के एक डोस घेणारे किंवा लसीकरण न झालेले होते. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती किंवा कोणत्याही आजाराग्रस्त असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याची चिंता जाहीर केली होती.

कोरोना महामारीच्या तीन लाटेचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये म्हटले की, तिसऱ्या लाटेदरम्यान फक्त २३.४ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. तर डेल्टा संसर्ग झाल्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये ७४ टक्के आणि पहिल्या लाटेमध्ये ६३ टक्के ऑक्सिजनची गरज भासली होती.

रुग्णालयात एकूण ४१ अल्पवयीन मुलांना दाखल केले होते. पण आतापर्यंत या वयोगटात मृत्यूची नोंद झालेली नाही. याशिवाय ७ जणांचा आयसीयू आणि २ जणांचा व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयाने म्हटले की, गेल्या लाटेमध्ये जेव्हा २८ हजार रुग्णांची नोंद झाली होती तेव्हा रुग्णालयात बेड्स नव्हते. आयसीयूत बेड्सचा तुटवडा भासत होता. गेल्या आठवड्यात जेव्हा तिसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली तेव्हा रुग्णालयात बेड्सचा तुटवडा नव्हता.

अहवालानुसार, पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयात एकूण २० हजार ८८३ रुग्णांना दाखल केले गेले होते. तर दुसऱ्या लाटत आणि तिसऱ्या लाटेमध्ये अनुक्रमे १ हजार ४४४ आणि १ हजार ३७८ रुग्णांना दाखल केले होते. पहिल्या लाटेमध्ये मृत्यूदर ७.२ टक्के होता, तर दुसऱ्या लाटेमध्ये वाढून १०.५ टक्क्यांवर पोहोचला. २०२२मध्ये आतापर्यंत कोरोना मृत्यूदर ६ टक्के नोंद झाला आहे.

या अभ्यासात म्हटले आहे की, गेल्या १० दिवसांत रुग्णालयात कोरोनाबाधित दाखल झालेल्या संख्यांमध्ये वाढ झाली आहे. दैनंदिन मृत्यूचा आकडा वाढला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे ओमिक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा सौम्य आहे. लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजनचा वापर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून ते २० जानेवारीपर्यंत आकड्यांवर हा अभ्यास करण्यात आला आहे.


हेही वाचा – Omicron Variant: चिंताजनक! तीन आठवड्यापूर्वीच मुंबईत ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात – टास्क फोर्स


 

First Published on: January 24, 2022 1:50 PM
Exit mobile version