घरताज्या घडामोडीOmicron Variant: चिंताजनक! तीन आठवड्यापूर्वीच मुंबईत ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात - टास्क...

Omicron Variant: चिंताजनक! तीन आठवड्यापूर्वीच मुंबईत ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात – टास्क फोर्स

Subscribe

ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्ग खूप वेगाने होत असल्यामुळे कोरोना केसेसमध्ये आता ओमिक्रॉनचे रुग्ण आधिक आढळत आहेत.

देशात कोरोनासह ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तसेच आता ओमिक्रॉनच्या नव्या उपप्रकारचा शिरकाव देशात झाला आहे. तर काल, रविवारी देशात ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची माहिती SARS-CoV-2 तसेच जिनोम सिक्वेन्सिंगचा अभ्यास करणारी तज्ज्ञ समितीने (INSACOG) दिली आहे. देशात कोरोनाची महामारी ही सामूहिक संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याचे INSACOG स्पष्ट केले. दरम्यान मुंबईत तीन आठवड्यापूर्वीच ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे समोर आली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत २० हजारांहून अधिक वाढत होत होती. तसेच ओमिक्रॉनचा हा सामूहिक संसर्ग खूप वेगाने होत असल्यामुळे कोरोना केसेसमध्ये आता ओमिक्रॉनचे रुग्ण आधिक आढळत आहेत. पण यादरम्यान ओमिक्रॉनच्या उपप्रकारामुळे संसर्ग झाला आहे की नाही? याचा कोणताही स्पष्ट परिणाम नाही.

राज्याचे कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी INSACOGच्या ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याच्या दाव्याला सहमती दर्शवली. डॉ. जोशी म्हणाले की, ‘ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्ग झाला आहे आणि हा खूप तुरळक आणि अत्यंत सांसर्गिक आहे यात काही शंका नाही. त्यामुळे त्यांनी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय BA.1, BA.2 आणि BA.3 सारखे ओमिक्रॉनचे प्रकार असले तरी सामुहिक प्रसाराचे मुख्य कारण कोणते हे स्पष्ट झाले नाही.’

- Advertisement -

पुढे डॉ. जोशी म्हणाले की, ‘ओमिक्रॉन अत्यंत संसर्गजन्य आहे, आपल्याला चार मापदंडांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपला दृष्टीकोन बदलला आहे, मृत्यू, रुग्णालयात दाखल होणे, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची क्षमता यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहेत. तसेच आपल्याला रुग्णांच्या लक्षणांवर जास्त लक्ष द्यावे लागले आणि गंभीर लोकं ओळखावे लागतील, जे गंभीर आज आणि मृत्यूचे शिकारी आहेत. याशिवाय आतापर्यंत ७५ टक्के दैनंदिन केसेस ओमिक्रॉनच्या आहेत, जो सामुहिक संसर्ग झाल्याचे स्पष्ट दर्शवते आहे.’

दरम्यान कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी ८५ टक्के नमुने ओमिक्रॉन संसर्गित आढळले आहेत. याबाबत शनिवारी मुंबई महानगरपालिकेचे आठ संपूर्ण जिनोमिक सर्वेक्षण अहवालात उघड केले. मुंबईत आतापर्यंत १ हजार ९ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. दरम्यान आठ बॅचसाठी एकूण ३७५ नमुने गोळा केले होते, त्यापैकी ३२१ ओमिक्रॉनबाधित आढळले होते, तर उर्वरित नमुने डेल्टा आणि त्याच्या उपप्रकारांसह आढळले होते.

- Advertisement -

महाराष्ट्राचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, ‘मुंबईत आणि पुण्यात ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. संसर्गाचा वेग पाहण्यासाठी अधिक सखोल विश्लेषणाची गरज आहे. एका महिन्यापूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील एकाही नमुन्यात ओमिक्रॉन आढळला नाही. नंतर १० टक्क्यांनी यामध्ये वाढत झाली. त्यामुळे ओमिक्रॉन वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.’


हेही वाचा – Omicron Variant: डोळ्यासंबंधित ‘ही’ लक्षणे दिसतायत, तर करू नका दुर्लक्ष; असू शकतो ओमिक्रॉनचा संसर्ग


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -