अमेरिकेचं नाव घेऊन इम्रान खान यांचे मोठे विधान, लाईव्ह स्पीचमध्ये घसरली जीभ

अमेरिकेचं नाव घेऊन इम्रान खान यांचे मोठे विधान, लाईव्ह स्पीचमध्ये घसरली जीभ

अमेरिकेचं नाव घेऊन इम्रान खान यांचे मोठे विधान, लाईव्ह स्पीचमध्ये घसरली जीभ

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाने तेहरिक-ए- इन्साफ (पीटीआय) ने नॅशनल असेंब्लीमध्ये आपले बहुमत गमावले आहे. मात्र इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गुरुवारी इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना पाकिस्तानमध्ये सरकार पाडण्यासाठी परकीय देशांची शक्ती असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार नसून रविवारी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेला सामोरे जाणार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटलं आहे. संभाषणादरम्यान अमेरिकेचे नाव घेऊन इम्रान खान यांनी मोठी चूक केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता राजकीय संकटात आहे. खान यांनी बहुमतसुद्धा गमावले आहे. त्यांची सत्ता जाण्याच्या परिस्थितीमध्ये असूनही त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. गुरुवारी देशाला संबोधित करताना खान यांनी इस्लामाबादमधील रॅलीत उल्लेख केलेल्या पत्राचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले की, केवळ देशाबाहेरुनच नाही तर त्यांच्या सरकारचे मंत्रीही त्यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतून एक पत्र येते असे म्हणताच इम्रान खान थांबले आणि म्हणाले अमेरिका नव्हे तर परदेशी देशाने पाकिस्तान सरकारविरोधात पत्र पाठवले आहे.

इम्रान खान यांचे देशपातळीवर थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचा उल्लेख करत ८ किंवा ७ मार्चला अमेरिकेने एक पत्र पाठवले होते. अमेरिका नाही तर दुसऱ्या देशातून पत्र आले होते. त्या देशातून संदेश येतोय त्यामुळे सगळ्यांशी मी संवाद साधत आहे. जो संदेश आला आहे तो पंतप्रधानांच्या विरोधात आहे पण तो पाकिस्तानच्या जनतेच्या विरोधात आहे असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

काय होते पत्रात?

परदेशातून आलेल्या पत्रात असे म्हटलं आहे की, अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास पाकिस्तानला माफ केले जाईल आणि तसे झाले नाही तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, यावर इम्रान खान म्हणाले हा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला नसतानाही पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती येणार आहे हे त्या परदेशाला माहीत होते.

आपण त्यांचे नोकर असल्यासारखे परदेशातील देशांचे म्हणणे

इम्रान खान यांनी अमेरिकेचे नाव घेऊन त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी अनेक आरोप देखील केले आहेत. आम्ही नेहमी अमेरिकेला मदत केली आहे. परंतु तरिही पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेत ९/११ चा हल्ला झाला त्यामध्ये पाकिस्तानचा हात नव्हता. २२ करोड लोकसंख्या असलेल्या देशात परदेशी येतात आणि म्हणतात आम्हाला तुमचे परराष्ट्र धोरण आवडले नाही कारण तुम्ही रशियाला गेला होता. परदेशातील देश आपण त्यांचे नोकर असल्यासारखे वागतात, पाकिस्तानच्या कलंकित नेत्यांना अमेरिकेच्या मदतीने सत्ता मिळवायची असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला.


हेही वाचा : Imran Khan : अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वीच घाबरले इम्रान खान, खासदारांना व्हिप जारी

First Published on: April 1, 2022 8:21 AM
Exit mobile version