टेलिव्हिजन सीरियल्सच्या बोल्ड आणि बेड सीनवर पाकिस्तानात बंदी, कारण वाचा

टेलिव्हिजन सीरियल्सच्या बोल्ड आणि बेड सीनवर पाकिस्तानात बंदी, कारण वाचा

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलॅरिटी ऑथोरिटी (PEMRA) ने टेलिव्हिजन चॅनेल्सना नवीन निर्देश देऊ केले आहेत. पाकिस्तानातील प्रेक्षकांच्या तक्रारीवरून हे नवे निर्देश देण्यात आले आहेत. सीरियल्समध्ये दाखवण्यात येणारे विचित्र सीन्स दाखवणे बंद करा ही प्रामुख्याने प्रेक्षकांची मागणी आहे. या नाट्यमय सादरीकरणामध्ये पाकिस्तानच्या समाजाच्या खऱ्या चित्राचे प्रतिनिधीत्व करण्यात येत नाही. त्यामुळेच नाट्यमय स्वरूपात दाखवण्यात येणाऱ्या सीन्सविरोधात अनेक प्रेक्षकांनी तक्रारी केल्या आहेत. पाकिस्तानच्या समाजाला इस्लामचे शिक्षण आणि संस्कृतीची अवहेलना केल्याबाबत तसेच नाट्यमय रूपांतर हे ग्लॅमराईज केल्याबाबत पीईएमआरएने टेलिव्हिजन चॅनेल्सना हे निर्देश दिले आहेत.

पीईएमआरएच्या अहवालानुसार गळाभेट, जवळीक साधणे, अश्लील, बोल्ड, बेड सीन तसेच विवाहित जोडप्यांचे प्रेमाचे सीन्स यासारख्या नाट्यमय रूपांतराला प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. हे सीन्स दाखवताना खूपच ग्लॅमराईज करून दाखवण्यात येत असल्याच्या प्रेक्षकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा सीन्सच्या समीक्षा करण्याच्या अनुषंगाने वारंवार निर्देश याआधी देण्यात आले होते. विवाहित जोडप्यांमध्ये प्रेमसंबंध सीरियल्समध्ये दाखवणे हे पाकिस्तानच्या समाजाचे योग्य चित्रण नाही. म्हणूनच अशा गोष्टी अधिक ग्लॅमराईज करण्याची गरज नसते.आंतरराष्ट्रीय न्याय आयोगाच्या दक्षिण आशियाच्या कायदा सल्लागार रीमा ओमर यांनीही पीईएमआरच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. अखेर काहीतरी योग्य निर्देश दिल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

पाकिस्तानच्या पीईएमआरएने सर्व सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनेल्सला नवे निर्देश देऊ केले आहेत. आक्षेपार्ह असे सीन्स प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करतात. तसेच प्रेक्षकांचे मन विचलित करतात. तसेच पाकिस्तानच्या समाजाच्या सभ्यतेविरोधातील सीन्सच्या बाबतीत हे निर्देश आहेत. पाकिस्तान सिटीझन पोर्टलला या सगळ्या तक्रारी येत होत्या. तसेच कॉल सेंटर, फिडबॅक सिस्टिम आणि सोशल मिडिया तसेच वॉट्स एपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारीमुळेच पीईएमआरएने हे निर्देश पुन्हा देऊ केले आहेत.


हेही वाचा – ‘येथे कमवतात आणि पाकिस्तानला पाठवतात’ -साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा शाहरुखवर निशाणा

First Published on: October 25, 2021 9:56 AM
Exit mobile version