पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. आज सकाळी साडे तीन वाजता भारतीय वायु दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. ही बैठक पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे बोलाविण्यात आली आहे. भारतीय वायुसेनाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड हालचालींना वेग आला आहे.

‘पाकिस्तानला संपवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही’

आज सकाळी भारतीचे हवाई विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसले, असा आरोप पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात आला. त्यामुळे भारताने हल्ला केला, या माहितीला पाकिस्तानच्या लष्कराने दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड हालचाली होताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावली. या घटनेनंतर कुरेशी म्हणाले की, ‘पाकिस्तानला संपविण्याचे भारतीयांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.’ यासोबतच पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, भारतातही मोठ्या हलाचाली सुरु झाल्या आहेत. भारताच्या सीमारेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतीय सैवनिय दलाचे अध्यक्ष, वायुसेनेचे अध्यक्ष, सुरक्षा सल्लागार आणि भाजपचे इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

First Published on: February 26, 2019 12:00 PM
Exit mobile version