घरदेश-विदेशLive Update: हल्ल्यात मसूद अजहरच्या मोठा भावाचा मृत्यू

Live Update: हल्ल्यात मसूद अजहरच्या मोठा भावाचा मृत्यू

Subscribe

जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलो बॉम्ब हल्ला भारताच्या हवाई दलाने केला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला आहे.

Update –  भारतीय हवाई दल मिराज २००० मधून पाक व्याप्त काश्मिरमधील जैश-ए-मोहम्मदच्या कॅम्पवर एकूण ६ बॉम्ब टाकण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

Breaking – इब्राहिम अजहरचा एअर स्ट्राईकमध्ये मृत्यू, इब्राहिम जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहरचा मोठा भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. जैशचा काश्मीरी म्होरक्या अजहर खान याचाही खात्मा झाला

- Advertisement -

Breaking – हवाइ हल्याच्या कारवाईनंतर भाजपाच्या कोणत्याही आमदार-खासदारांनी कसल्याच प्रतिक्रिया देऊ नयेत. तसेच ट्विट देखील करू नये, कारण हा संपूर्ण देशवासीयांच्या भावनेचा विषय असल्याचे फर्मान केंद्राकडून प्रत्येक राज्यात देण्यात आले आहे. ही वेळ जल्लोष करण्याची नसून, पाकिस्तानला अजून धडा शिकवण्याची आहे. त्यामुळे नेत्यांना संयम राखण्याचे केंद्रातून आदेश


Breaking –  भारताच्या शुरांना नमन करतो, नागरिकांच्या जल्लोशाचे कारण मला माहिती आहे- पंतप्रधान ,नरेंद्र मोदी

#Live : हवाई हल्ल्यानंतर मोदींची राजस्थानात सभा

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, February 26, 2019


Breaking –  वायुसेनेच्या हल्ल्यात ३५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि २५ ट्रेनर ठार झाले आहेत. यामध्ये युसूफ अजहर याचाही समावेश होता. युसूफ हा मसूदचा मेहुणा असल्याची माहिती मिळते आहे


Breaking – पाकिस्तानही भारताच्या हल्ल्याला उत्तर देणार असल्याची घोषणा परराष्ट्रमंत्री मेहमुद कुरेशी यांनी सांगितले


Breaking – हल्ल्यानंतर सर्व पायलट सुरक्षित परतले असून पुलवामा हल्ल्याचे सरकारकडून चांगले प्रत्योत्तर देण्यात आले आहे – भारतीय लष्कर


 

Breaking – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सायंकाळी पाच वाचता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे


Breaking – पाकिस्तानमधील या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अनेक प्रशिक्षक देखील हल्ल्यात ठार


Breaking – हल्ल्यामध्ये जैशच्या अनेक म्होरक्यांना घातलं कंठस्नान – परराष्ट्र सचिव


Breaking – हवाई हल्ल्याला परराष्ट्र खात्यानं दिला हल्ल्याला दुजोरा


Breaking – परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषद सुरू – बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदचे सर्वात मोठे तळ उद्ध्वस्त केले



भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. भारतीय म्हणून भारतीय सेनेचा अभिमान वाटतो. आमच्या शहीद जवानांचे बलिदान वाया जाणार नाही हे पाकिस्तानला दाखवून दिलं. उपलब्ध माहितीनुसार एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेचा खात्मा केला. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होते त्या कॅम्पला उध्वस्त करण्याचे काम केलं. पली शक्ती काय असते हे सैन्यांनी दाखवून दिले. मोदींचे नेतृत्व आणि निर्णयात्मक दिल ते अभिमानस्पद आहे. मुंबईत नेहमी हाय अलर्ट असत नागरिकांनी पॅनिक होऊ नये. सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहेत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरु झाली आहे. केंद्रीय सुरक्षा समितीची पंतप्रधानांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन, परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज, अजित डोवल उपस्थित आहेत.


हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचालिंना वेग आला आहे. पाकिस्तानमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री आणि लष्कराने तातडीची बैठक बोलावली आहे.


भारतीय वायुसेनेने तब्बल २१ मिनिटं बॉम्बचा हल्ला केला. याबद्दल भारतीय वायुसेनेने ट्विट केले आहे. भारतीय वायूसेनेने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या १२ दिवसानंतर पाकिस्तानला उत्तर देण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या तळांना उध्वस्त करण्यात आले आले.


पुलवामा दहशवादी हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या भारताने पाकिस्तानचा बदला घेतल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला आहे. मिराज २००० या लढाऊ विमानानं जैश-ए-मोहम्मदच्या १२ तळावर हल्ला केला. बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ आहे. हल्ल्यानंतर बालाकोटामध्ये स्फोटांचे मोठे आवाज आले. जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलो बॉम्ब हल्ला भारताच्या हवाई दलाने केला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, या हवाई हल्ल्याची अजित डोवल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदिंना माहिती दिली होती.

१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेतला आहे. १२ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायूसनेने केलेल्या हल्ल्यात बालाकोट, चकोटी, मुजफ्फराबादमधील जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त झाले आहेत. बालाकोट पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाहमध्ये येतो. हवाई हल्ला करण्यात आलेली जागा एलओसीपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यात जैशचा कंट्रोल रुम उध्वस्त झाला असून २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशल कॉन्फरन्सचे नेता उमर अब्दुल्ला यांनी भारताच्या या कारवाईवर सांगितले की, ‘जर ही गोष्ट खरी असेल तर हा हल्ला छोटा नाही. हे आमच्या अपेक्षेपलिकडे आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -