योग्य वेळ आल्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ – पाकिस्तान

योग्य वेळ आल्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ – पाकिस्तान

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महसूद कुरेशी

भारतीय वायुसेनेने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आज बदला घेतला आहे. आज पहाटे ३.३० वाजता भारतीय वायुसेनेच्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यामध्ये दहशतवाद्यांचे तळे पूर्णपणे उद्धवस्त झाली. शिवाय, २०० ते ३०० दहशतवादी यामध्ये ठार झाले. विशेष म्हणजे या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे दोन भाऊ आणि एक मेहुणा या हल्ल्यामध्ये मारले गेले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय तळावर जाणार, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले कुरेशी?

शाह मोम्मद कुरेशी म्हणाले की, ‘सध्या वातावरण योग्य नाही. योग्य वेळ आणि तसं वातावरण निर्माण झाल्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय नेऊ असे कुरेशी म्हणाले आहेत.’ दरम्यान, या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड हालाचालींना सुरुवात झाली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे तातडीची बैठक बोलावली होती.

कुठल्याही परिस्थितीला तयार राहा – इम्रान खान

या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्यावर दबाव वाढत आहे. या हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलवली होती. त्यानंतर आता त्यांनी पाकिस्तानातील नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असे आवाहन इम्रान खान यांनी केलं आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे.

First Published on: February 26, 2019 5:04 PM
Exit mobile version