पाकिस्तानी अधिकाऱ्यानेच चोरले पाकीट

पाकिस्तानी अधिकाऱ्यानेच चोरले पाकीट

पाकीट चोरतांना पाकिस्तानी अधिकारी

सोशल मीडियावर नेहेमीच व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकीत करतात तर काही हसवतात. मात्र याच व्हिडिओमुळे पाकिस्तानची मात्र जागतिक स्तरावर नामुश्की झाली आहे. याला कारणच मोठं आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांमुळेच देशाला मान खाली घालावी लागली. इम्रान खान सरकारच्या राज्यात कुवैत येथून आलेल्या अधिकाऱ्यांचे पाकीट चोरल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी अधिकारी कुवैती अधिकाऱ्याच्या टेबलावर राहिलेल पाकीट चोरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणही नसल्याचा फायदा घेत या अधिकाऱ्याने हे कृत्य केलं. मात्र पाकीट मिळत नसल्याची तक्रार अधिकाऱ्याने केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ २० सेकंदाचा आहे.

काय आहे घटना?

पाकिस्तानात इम्रान खान यांची सत्ता आहे. पाकिस्तानात गुंतवणूक करण्यासाठी कुवैतहून एक प्रतिनिधीमंडळ इस्लामाबाद येथे आले होते. यामंडळात काही मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश होता. कार्यक्रमानंतर हॉलमधून निघताना एका अधिकाऱ्याचे पाकीट टेबलावरच राहिले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्याने याचा फायदा घेऊन हे पाकीट आपल्या खिशात टाकले. कुवैती अधिकाऱ्याने पर्स शोधले मात्र ते सापडले नाही. याची तक्रार तेथील उपस्थीत अधिकाऱ्यांना केल्यानंतर सीसीटीव्ही चेक करण्यात आले. सीसीटीव्हीत बघितल्यानंतर दोषी अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला पाकीट घेतले नसल्याचे त्याने सांगितले मात्र नंतर त्याने पाकीट कुवैती अधिकाऱ्यांना सोपवले. दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिले आहे. अद्या या अधिकाऱ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली गेली नाही. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा मलीन झालीच मात्र कुवैतकडून त्यांनी विश्वासही गमावला आहे.

 

First Published on: October 1, 2018 10:28 PM
Exit mobile version