Pakistan Inflation: पेट्रोलपेक्षा दूध महाग, पाकिस्तानने महागाईत नेपाळ-भूटानलाही मागे टाकलं

Pakistan Inflation: पेट्रोलपेक्षा दूध महाग, पाकिस्तानने महागाईत नेपाळ-भूटानलाही मागे टाकलं

Pakistan Inflation: पेट्रोलपेक्षा दूध महाग, पाकिस्तानने महागाईत नेपाळ-भूटानलाही मागे टाकलं

पाकिस्तानमधील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानमधील दूतावासमधील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकवण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे जगभरात चर्चा सुरु होती. मात्र यानंतर आता पेट्रोलच्या दरापेक्षा दूधाचे दर अधिक असल्याचे समोर आल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमधील महागाई समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये दूध १४० रुपये लीटर विकण्यात आले तेव्हा पेट्रोलचा दर ११३ रुपये प्रति लीटर होता. नोव्हेबंर महिन्यात पाकिस्तानमध्ये महागाई ११.५ टक्के होती.

पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या महागाईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी चलन रुपयाची घसरण होत आहे. परकीय चलनाचा साठासुद्धा कमी झाला आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी देश चालवण्यासाठी पैसे नसून कर्ज वाढत असल्याचे नोव्हेंबरमध्ये म्हटलं होते. इंधनाचे दरही वाढले होते. कराचीमध्ये ज्यावेळी १४० रुपये प्रति लीटर दूधाची किंमत होती तेव्हा देशात पेट्रोलचे दर ११३ रुपये प्रति लीटर होते. यामुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका उडाला असल्याचे जगासमोर आलं आहे.

पेट्रोलपेक्षा दूध आणि साखर महाग

शासकीय आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये एलपीजी गॅस २१७ रुपये प्रति किलो आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरची किंमत २ हजार ५६० रुपये आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ९ हजार ८४७ रुपये प्रति किलो आहे. रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे भाव चांगलेच वाढले असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त महागाई वाढली असल्याचे आढळले आहे. पाकिस्तानमध्ये मोहरमसारख्या दिवशी दूधाचे भाव पेट्रोलपेक्षाही वाढले होते.

महागाईला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या महागाईमुळे आणि बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढलं आहे. एका २७ वर्षीय तरुणाने घर चालवण्यासाठी पैसे आणि नोकरी नसल्यामुळे स्वतःला पेटवून आत्महत्या केली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी देखील महागाईला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप केला होता. तसेच विरोधी पक्ष मुस्लिम लीग नवाजकडून इमरान खान सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे तरुणांना आत्महत्या करण्याचा मार्ग निवडावा लागत आहे. इमरान खान सरकारने १ करोड रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिलं होते. या आश्वासनांमुळे सरकारच्या अडचणी वाढत असून देशात महागाई वाढीवरुन चर्चा सुरु आहे.


हेही वाचा : Omicron Variant : ५ ते १४ वयोगटातील मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका, WHO चा इशारा

First Published on: December 8, 2021 8:17 AM
Exit mobile version