Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मोठे हल्ले, लष्करी तळावर लागली भीषण आग

Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मोठे हल्ले, लष्करी तळावर लागली भीषण आग

Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये भीषण हल्ला, लष्करी तळावर लागली आग

पाकिस्तानच्या (Pakistan) सियालकोटमध्ये (Sialkot) काही मोठे हल्ले (Blast) झाले आहेत. यामुळे लष्करी तळावर (Army Base) भीषण आग लागली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानमधील लष्करी तळावर निशाणा साधला होता. पण हे हल्ले कसे झाले याबाबत अद्यापही कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. तसेच या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती पाकिस्तान एआरवाय न्यूजने आयएसपीआरच्या हवाल्याने दिली आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये सध्या इमरान खान सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. अशात सियालकोटमध्ये हल्ले झाल्याने इमरान खान सरकारला आणखीन अडचणीत आणले जाऊ शकते.

द डेली मिलापचे पत्रकार ऋषि सूरी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘उत्तर पाकिस्तानातील सियालकोट लष्करी तळावर काही हल्ले झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा एक दारुगोळा पुरवठा करणारा भाग आहे. त्यामुळे हल्ल्यानंतर भीषण आग लष्करी तळावर लागली आहे. आतापर्यंत हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे? हे स्पष्ट झालेले नाही.’

पाकिस्तानमध्ये या महिन्यात पेशावरच्या शिया मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला झाला होता. ज्यामध्ये ६४ लोकांचा मृत्यू झाला होता तर २०० लोक जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी गट इस्लामिक स्टेट-खुरासनने घेतली. माहितीनुसार या घटनेस जबाबदार असलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार मारले गेले आहे.

तसेच २ मार्चला पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटामधील एका पोलीस वाहनाजवळ स्फोट झाला होता. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला होते आणि २४ जण जखमी झाले होते. क्वेटाच्या फातिमा जिन्ना रोडवर हा हल्ला झाला होता. माहितीनुसार, या हल्ला दोन ते अडीच किलोग्रॅम स्फोटाचा वापर केला गेला होता.


हेही वाचा – Ukraine Russia War: 98 वर्षीय वृद्ध महिलेची युक्रेनच्या सैन्यासोबत युद्धात उतरण्याची तयारी


 

First Published on: March 20, 2022 12:18 PM
Exit mobile version