घरताज्या घडामोडीUkraine Russia War: 98 वर्षीय वृद्ध महिलेची युक्रेनच्या सैन्यासोबत युद्धात उतरण्याची तयारी

Ukraine Russia War: 98 वर्षीय वृद्ध महिलेची युक्रेनच्या सैन्यासोबत युद्धात उतरण्याची तयारी

Subscribe

आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी एक ९८ वर्षीय वृद्ध महिलेने युक्रेन सैन्यात भरती अर्ज केला. पण..

युक्रेन आणि रशियामधील युद्ध काही थांबायचे नावाच घेत नाहीये. आज युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा 25वा दिवस आहे. यादरम्यान रशियाने युक्रेनमधील मोठ-मोठी शहरे उद्ध्वस्त करून टाकली आहेत. युद्धाला 25 दिवस होऊनही कोणताही देश माघार घेण्यास तयार नाहीये. माहितीनुसार, युक्रेनची राजधानी किवमध्ये 228 जणांचा मृत्यू झाल्याचे दावा करण्यात आला आहे. दरम्यान या युद्धाच्या सुरुवातीपासून युक्रेनमधील सर्वसामान्य जनतेने हातात शस्त्रात्रे घेतली आहेत. युक्रेनमधील अनेक नागरिक सैन्यात भरती होऊन देशाकरिता जीव देण्यासाठी तयार झाले आहेत. अशाच प्रकारे 98 वर्षीय वुद्ध महिला देखील आपल्या देशासाठी सैन्यात सामिल होण्यास तयार झाली आहे.

माध्यमाच्या माहितीनुसार, आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी एक ९८ वर्षीय महिलेने युक्रेन सैन्यात भरती होण्याबाबत सांगितले आहे. हे देशप्रेम पाहून या वृद्ध महिलेने लोकांची मने जिंकली आहे. ९८ वर्षीय युक्रेनी महिला ओल्हा तेवरदोखलिबोवा यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होते. युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, ‘ओल्हा यांनी दुसऱ्या महायुद्धात सक्रिय रुपात सहभाग घेतला आहे.’

- Advertisement -

मंत्रालयाच्या माहितीनुसार, ओल्हा यांनी सैन्यात भरती होण्यासाठी निवदेन दिले आहे. परंतु अधिक वय असल्यामुळे त्यांना सैन्यात भरती होण्यास नकार देण्यात आला आहे. मंत्रालयाने म्हटले की, ‘गुण आणि अनुभव असूनही वय बाधा बनली आहे. त्या लवकरच आणखीन एका विजयाचा जल्लोष करतील.’

- Advertisement -

आतापर्यंत युक्रेनचे २० लाखांहून अधिक लोकं शरणार्थी

आतापर्यंत युक्रेनहून २० लाखांहून अधिक लोकांनी पोलंडमध्ये शरणागती पत्करली आहे. संयुक्त राष्ट्राचे म्हणणे आहे की, २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ३३ लाख लोक देश सोडून दुसऱ्या देशात गेले. पोलंड शिवाय हंगरी, स्लोवाकिया, मोल्दोवा आणि रोमानियामध्ये शेकडो लोक गेले आहेत.


हेही वाचा – भारत-जपानमध्ये साडे तीन वर्षानंतर पहिल्यांदाच होणार शिखर बैठक; जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -