तुम्ही झोपा काढत होता का? पाकिस्तानी जनतेचा वायूसेनेला सवाल

तुम्ही झोपा काढत होता का? पाकिस्तानी जनतेचा वायूसेनेला सवाल

हवाई हल्ला

भारतीय वायूसेनेने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाी केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे भारतीय हवाई दलाने चोखप्रत्युत्तर दिले आहे. आज भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. भारताने केलेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच सोशल मीडियावर माहिती पसरली. त्यानंतर फक्त भारत नाही तर पाकिस्तानमधून देखील जनतेच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. एकीकडे पुलवामा हल्ल्याचे भारताने पाकिस्तानला चोखप्रत्युत्तर दिल्यामुळे भारतातील जनता जल्लोष करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तामध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानी नागरिकांनी सोशल मीडियावरुन पाकिस्तानच्या सरकारलाच सवाल उपस्थित केले आहे.

‘जेव्हा भारतीय वायुसेना पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करत होती तेव्हा आपली वायुसेना झोपा काढत होती का? असे सवाल पाकिस्तानी सरकारने विचारले आहेत. दरम्यान पाकिस्तानमधील जनतेने सुरक्षिततेसंदर्भातही सरकारला गंभीर प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, काही नागरिकांनी थेट पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनाच सवाल केले आहेत.

भारतीय वायूसेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या बालाकोट, मुजफ्फराबाद आणि चकोठी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला. जैश-ए-मोहम्मदचे १२ तळ उध्वस्त करण्यात आले. वायूसेनेने मिराज – २००० या लढाऊ विमानाने जवळपास १००० किलो बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र तो याच घटनेचा असल्याचा कोणतेही खात्रीलायक वृत्त नाही.

First Published on: February 26, 2019 3:35 PM
Exit mobile version