पाकची घुसखोरी सुरुच, जम्मू-काश्मीरात पुन्हा सापडला बोगदा

पाकची घुसखोरी सुरुच, जम्मू-काश्मीरात पुन्हा सापडला बोगदा

पाकची घुसखोरी सुरुच, जम्मू-काश्मीरात पुन्हा सापडला बोगदा

सीमा सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत पाकिस्तानचे घुसखोरीचे मनसुबे उधळले आहेत. सीमा सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एक बोगदा सापडला आहे. मागील काही महिन्यांपासून भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वीही जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी बोगदा सापडला होता. अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, हा बोगदा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तयार करण्यात आला आहे. आतंकवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी हा बोगदा तयार करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी केलेल्या तपासात हा बोगदा सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ बीएसएफ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले.

तत्पूर्वी, नगरोटा चकमकीनंतर बीएसएफला २२ नोव्हेंबर २०२० रोजी सांबाच्या रीगल भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर बोगदा सापडला. आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे १६० मीटर अंतरावर आणि तारांच्या घेरपासून ७० मीटर अंतरावर सांबाच्या रिगल भागात बोगदा सापडला. बोगद्याची खोली २५ मीटर होती जी पाकिस्तान सीमेच्या दिशेने गेली होती.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी अशाप्रकारचे बोगदे पाकिस्तानकडून बांधण्यात येत आहेत. परंतु पाकिस्तानच्या प्रत्येक कृत्याची खबर भारतीय सैनिकांना माहित आहेत. त्यामुळे भारतीय सैनिक पाकचे षडयंत्र बिघडवित आहेत. गेल्या सहा महिन्यांत बीएसएफच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांनी बांधलेले बोगदे शोधून घुसखोरीचे प्रयत्न अयशस्वी केले.

आज सकाळी कठुआच्या जिल्ह्याच्या हिरानगर सेक्टरमधील बोबियान गावात आंतरराष्ट्रीय सीमेवर सापडलेल्या बोगद्यानंतर सुरक्षा दल आणि एजन्सी सतर्क झाल्या आहेत. या बोगद्यातून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे का? हे माहिती करण्यासाठी तपास पथकाला घटनास्थळावर बोलविण्यात आले आहे.

First Published on: January 13, 2021 4:36 PM
Exit mobile version