पाकने ईदसाठी अणुबॉम्ब ठेवले नाहीत; मेहबुबा मुफ्तींना पाकचा पुळका

पाकने ईदसाठी अणुबॉम्ब ठेवले नाहीत; मेहबुबा मुफ्तींना पाकचा पुळका

IND vs PAK : पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजर करणाऱ्या काश्मिरींवर राग का? मेहबुबा मुफ्तींचा सवाल

पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुबॉम्बवरुन केलेल्या विधानावर टीका करताना पुन्हा पाकच्या वतीने बाजू मांडली आहे. राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात बोलताना भारताने अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेत का, असं विधान केलं होतं. त्यावर टीका करताना मेहबुबा यांनी पाकिस्ताननेही अणुबॉम्ब ईदसाठी ठेवले नाहीत, असं वादग्रस्त विधान केलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत सांगितले आहे की, भारताने दिवाळीसाठी अणुबॉम्ब ठेवले नाही तसेच पाकिस्तानकडूनही अणुबॉम्ब ईदसाठी ठेवले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाप्रकारे विधान करुन सार्वजनिक चर्चेची पातळी खालावत आहेत अशी टीका केली.

राजस्थानच्या सभेत मोदींचे वक्तव्य 

लोकसभा निवडणुकीत मागील काही दिवसांपासून सर्व प्रचार दहशतवाद, पाकिस्तान आणि देशाची सुरक्षा अशा मुद्द्यांवर गाजताना दिसत आहे. पाकिस्तान आत्तापर्यंत अणुबॉम्बची भीती दाखवत होता, ती भीती आम्ही दूर केली. आमच्याकडची शस्त्रास्त्रे ही काही फक्त दिवाळीसाठी नाहीत अशा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सभेत दिला होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, आत्तापर्यंत कायम पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवली जात होती. पाकिस्तानही कायम म्हणत असे की आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत म्हणून. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर मग भारताकडे जे आहेत ते काय फक्त दिवाळीसाठी आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

First Published on: April 22, 2019 10:00 PM
Exit mobile version