तुर्की, सीरियानंतर आता पॅलेस्टाईन भूकंपाने हादरला! जाणवले 4.8 रिश्टर स्केलचे धक्के

तुर्की, सीरियानंतर आता पॅलेस्टाईन भूकंपाने हादरला! जाणवले 4.8 रिश्टर स्केलचे धक्के

तुर्की, सीरियानंतर आता पॅलेस्टाईन देखील मोठ्या विनाशकारी भूकंपाने हादरला आहे. सीरिया आणि तुर्कीत झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत 7700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही भूंकपाचे जोरदार धक्के जाणवून लागले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. पॅलेस्टाईनमधील या भूकंपाचा केंद्रबिंदू नब्लस शहरापासून 13 किमी उत्तरेस होता, ज्याची खोली 10 किमी अंतरापर्यंत होती.

पॅलेस्टाईनमध्ये मंगळवारी रात्री 11.14 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. वेस्ट बँकमधील एरियलच्या आग्नेय दिशेला 15 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र आहे, अशी माहिती पॅलेस्टाईन मंत्रालयाने दिली आहे. पॅलेस्टाईनसोबतच जेरुसलेम, बीट शेमेश आणि मेवासेरेट झिऑन भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतचे वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान तुर्की आणि सीरियात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत 7700 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 40 हजारांच्यावर नागरिक जखमी झाले आहेत. अनेकांनी हॉटेल, मॉल, सरकारी आश्रमगृहात आसरला घेतला आहे. या भूकंपात 6 हजारांहून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर विमानतळं देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने मृतांचा अधिक पटीने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
दरम्यान दोन्ही देशांमध्ये बचावकार्य वेगाने सुरु आहे. जगभरातून दोन्ही देशांना मदतीसाठी हात पुढे केले जात आहे. दरम्यान तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दोन यांनी एका निवेदन जाहीर करत, जगातील 84 देशांनी आतापर्यंत बचाव कार्यात मदत देऊ केली आहे. मदत करणाऱ्या देशांचे त्यांनी आभार मानले आहेत. तुर्की आणि सीरियात सोमवारी लागोपाठ तीन मोठे भूकंप झाले. यात दोन्ही देशात भीतीचे तणावाचे वातवरण निर्माण झालं. अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या, यात मोठी जीवित हानी झाली. या पार्श्वभूमीवर तुर्कीमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे.


श्रद्धाच्या डोक्यातील कवटीची आणि हाडांची केली पावडर; आरोपी आफताबची कबुली

First Published on: February 8, 2023 9:37 AM
Exit mobile version