पंडित राजन मिश्र यांचे कोरोनामुळे निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंडित राजन मिश्र यांचे कोरोनामुळे निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंडित राजन मिश्र यांचे कोरोनामुळे निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

संगीत क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. बनारस घराण्यातील प्रसिद्ध पंडित राजन-साजन मिश्र बंधू यांच्यातील ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्र यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे मिश्र बंधूंची जोडी तुटली आहे. राजन मिश्र यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयत उपचारादरम्यान त्यांची कोरोनाशी हार अपयशी ठरली असल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मिश्र यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. पंडित राजन मिश्र यांनी आपल्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समृद्ध केले. पंडित राजन मिश्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राजन – साजन मिश्र या प्रसिद्ध जोडीतील ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्र यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे देश एका महान शास्त्रीय गायक, संशोधक व गुरुला मुकला आहे. तसेच जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली असून सर्व चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान ह्रदयविकाराचा झटका

मिळालेल्या माहितीनुसार पंडित राजन मिश्र यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होता. उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती परंतु सेंट स्टीफन रुग्णालयात वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांना व्हेंटेलेटर लावण्यात आले परंतु तोवर खुप उशीर झाला होता. व्हेंटिलेटर मिळण्यापूर्वीच राजन मिश्र यांनी जगाचा निरोप घेतला होता.

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पंडित राजन मिश्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, शास्त्रीय संगीतात आपली वेगळी छाप सोडणारे पंडित राजन मिश्र यांचे निधन झाल्याने दुःखी झालो आहे. बनारस घराण्यातील मिश्रजी यांच्या जाण्याने कला आणि संगीत क्षेत्रातात मोठी हानी झाली आहे. या दुःखाच्या क्षणी मी त्याच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांविषयी शोक व्यक्त करतो. ओम शांति अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजन – साजन मिश्र या प्रसिद्ध जोडीतील ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्र यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंडित राजन मिश्र यांनी आपल्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समृद्ध केले. त्यांच्या निधनामुळे देश एका महान शास्त्रीय गायक, संशोधक व गुरुला मुकला आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पद्म भूषण पुरस्काराने होते सम्मानित

पंडित राजन मिश्र यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना २००७ मध्ये पद्म भूषणने सम्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीत जर्मनी, स्वित्झरलैंडसह इतर देशांत आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. तसेच आपल्या गायिकीमुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पंडित मिश्र यांचे बंधू साजन मिश्र एकाकी पडले आहेत. राजन-साजन मिश्र जोडी संगीत क्षेत्रात जगभर प्रचलित होती तसेच सर्व कार्यक्रमांना ही जोडी सोबतच दिसत होती. परंतु राजन मिश्र यांच्या जाण्याने ही जोडी पुन्हा एकत्र कधी पाहता येणार नसल्याने सर्व रसिक प्रेक्षक हळहळ व्यक्त करत आहेत.

First Published on: April 25, 2021 10:21 PM
Exit mobile version