तब्बल १०० तालिबानी दहशतवाद्यांना ठार करणारा अफगाण शेरशाह

तब्बल १०० तालिबानी दहशतवाद्यांना ठार करणारा अफगाण शेरशाह

तब्बल १०० तालिबानी दहशतवाद्यांना ठार करणारा अफगाण शेरशाह

अफगाणिस्तानवर तालिबानाने कब्जा करून आठवडा उलटला आहे. तालिबानच्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी अफगाणिस्तानमधील अनेक नागरिक मिळले त्या मार्गाने दुसऱ्या देशात जात आहे. अफगाणिस्तानचे नागरिक कोणत्याही परिस्थिती तालिबानातून मुक्त होऊ इच्छित आहे. पण अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांसोबत मुकाबला करण्यासाठी विरोधक एकजूट होऊ लागले आहेत. ब्रिटनमध्ये शिकलेला एक अफगाणी शेरशहा देशाला तालिबानच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी नेतृत्व करत आहे. आतापर्यंत तब्बल ६० ते १०० तालिबान्यांना या संघटनेने ठार केले आहे. काबुलच्या उत्तरेस असलेले पंजशीर खोरे अजूनही तालिबान जिंकू शकले नाही आहे.

माजी मुजाहिदीन कमांडरचा मुलगा अहमद मसूद घातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या बंडाचे नेतृत्व करत आहे. त्याला तालिबानी दहशतवाद्यांचा नाश करायचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्याचे सैन्य तालिबानी दहशतवाद्यांशी लढतील, असे वचन मसूदने दिले आहे. सँडहर्स्टमध्ये एक वर्ष सैन्याचा कोर्स करणाऱ्या मसूद जवळ किंग्स कॉलेज लंडनची डिग्री आहे. जवळपास ४० वर्षापूर्वी सोव्हिएत विरोधी प्रतिकारातील मुख्य नेत्यांपैकी एक अहमद शाह मसूदचा मुलाने पंजशीर खोऱ्यात आपला गट बनवला आहे. येथून तालिबान्यांविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करत असून यामुळे तालिबानला पंजशीरमध्ये विरोधाचा सामना करावा लागत आहे. अशात नार्दन अलायन्स तालिबान विरोधात लढाई करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

द मिररच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानचे सर्वोच्च हेर आणि पदावरून हटवलेले उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह ३२ वर्षी मसूदचे समर्थन करत आहेत. काबुलमध्ये सालेहचे गुप्तहेरांची चांगले नेटवर्क आहे. दरम्यान आता अफगाणिस्तानमध्ये मसुदच्या बंडामुळे गृहयुद्ध होण्याची भिती निर्माण झाली आहे. कारण काबुलमधून ब्रिटन आणि अमेरिकन सैन्यांनी हजारो लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये अफगान राष्ट्रीय रक्षा आणि सुरक्षा दलाचे लोकं पंजशीरला गेले असून ते मसूदच्या गटाला आणखीन मजबूत करत आहेत. तसेच यामध्ये ते देखील सामिल होऊन त्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे तालिबानच्या काही गटांवर हल्ला केला जात आहे.

मसूदच्या वडिलांना ‘पंजशीर का शेर’ म्हटले जाते होते. ९/११च्या पूर्वी अल-कायदाने त्यांची हत्या केली होती. त्यांनी सीआयए समर्थित नॉर्दर्न कॉलिशनचे नेतृत्व केले, ज्यांनी २००२मध्ये तालिबान्यांना बाहेर केले होते. त्यामुळे आता मसूदला भीती आहे की, अफगाणिस्तामध्ये तालिबान शासन पुन्हा एकदा अल-कायदा शैलीतील अत्याचाराचे षडयंत्र करण्याचे स्वातंत्र्य देईल. या अनुषंगाने मसूद म्हणाला की, ‘अफगान लोकांसाठी तालिबान ही एकच समस्या नाही आहे. तालिबानच्या नियंत्रणात अफगाणिस्तान कट्टरपंथी इस्लामी दहशतवाद्यांचे ग्राउंड जीरो होईल. पुन्हा एका लोकशाही विरोधात षडयंत्र रचले जाईल. त्यामुळे मी आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी तयार आहे. मुजाहिदीन सैन्यासोबत पुन्हा एकदा तालिबानसोबत मुकाबल करण्यासाठी तयार आहे.’


हेही वाचा – अफगानिस्तानातून १४६ भारतीय दोहामध्ये दाखल, रविवारी ३९२ लोकांना करण्यात आले ‘एअरलिफ्ट’


 

First Published on: August 23, 2021 10:06 AM
Exit mobile version