२५ हजारांच्या दंडाला घाबरुन वडिलांनी मुलाला डांबले घरात

२५ हजारांच्या दंडाला घाबरुन वडिलांनी मुलाला डांबले घरात

गाडीची चावी मागतो म्हणून वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला घरात डांबल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे घडली आहे. या मुलाचे नाव मुकेश सिंह असे आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी दुचाकी घेतली. त्याच्या वडिलांचे नाव धरम सिंह असे आहे. धरम सिंह यांनी गाडी घेतल्यानंतर त्यांचा १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा मुकेश सिंह देखील गाडी चालवत असे. मात्र, आता वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. आता परवानाशिवाय गाडी चालवल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. त्यामुळे या २५ हजाराच्या दंडाला घाबरुन धरम यांनी मुकेशला घरात डांबले.


हेही वाचा – ‘या’ अवस्थेत सापडले शिक्षक-शिक्षिका; गावकऱ्यांनी दिला चोप


 

पोलिासांनी बजावले बाप-लेकाला

मुकेशला घरात डांबल्यानंतर तो सैरभैर झाला. त्याने खुप आरडोओरड केली. खरंतर चूक त्याचीच होती. आपल्या वडिलांनी त्याला बजावूनही तो गाडीचा हट्ट करत होता. आपले वडील कामावर गेले की तो शहरात गाडी चालवत फिरत असे. मात्र, आता वाहतुकीचे नियम कडक झाल्याने त्याच्या वडिलांनी त्याच्याकडून दुचाकीची चावी काढून घेतली आणि त्याला एका खोलीत डांबले. मुकेशने आपल्या वडिलांविरोधात पोलिसांना तक्रार केली. त्याने पोलिसांना फोन लावून वडिलांची तक्रार केली. पोलीस घरी गेले तेव्हा धरम सिंह यांनी स्पष्टीकरण दिले. पोलिसांनी दोघांच्या बाजू एकल्यानंतर पोलिसांनी दोघांना गुण्यागोविंदाने राहण्याचे बजावले.


हेही वाचा – नियम बदलले! PF चे पैसे काढणे आता एकदम सोप्पे

First Published on: September 11, 2019 3:08 PM
Exit mobile version