बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?, या वादग्रस्त विधानावर परेश रावल यांनी मागितली माफी

बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?, या वादग्रस्त विधानावर परेश रावल यांनी मागितली माफी

बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी गुजरातमध्ये परेश रावल यांनी कॅम्पेन राबवले होते. याचं दरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यावरुन त्यांच्यावर अनेकजण टिका करु लागले आहेत. गुजरातमध्ये परेश रावल यांच्या भाजपा पक्षाचा प्रचार करण्यासाठी पोहोचले होते. जिथे त्यांनी लोकांनी संबोधित केलं आणि काही असं वक्तव्य केलं ज्यामुळे लोक भडले आहेत. आपल्या भाषणामध्ये परेश रावल यांनी रोहिंग्या मुस्लिमांचा उल्लेख केला आणि त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे.

काय म्हणाले परेश रावल?

परेश रावल यांनी गुजरातमधील वलसाड येथे गुजराती भाषेत लोकांना संबोधित केले. महागडे गॅस सिलिंडर आणि रोजगाराच्या मागणीबाबत त्यांनी सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यावेळी परेश रावल म्हणाले की, “‘गॅस सिलिंडर महाग असला तरी स्वस्त होणार आहे. लोकांना रोजगारही मिळेल, पण रोहिंग्या मुस्लिम आणि बांग्लादेशी तुमच्या आजूबाजूला राहू लागल्यावर काय होईल. जसं दिल्लीत होत आहे. तेव्हा तुम्ही गॅस सिलेंडरचे काय कराल? बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?”

तृणमूस काँग्रेसने केला विरोध

परेश रावल यांनी मागितली माफी

 


हेही वाचा :

सोमी अलीने सलमान खानवर केला शारीरिक शोषण आणि सिगारेटचे चटके दिल्याचा गंभीर आरोप

First Published on: December 2, 2022 4:47 PM
Exit mobile version