मुंबईतील जैन मंदिरात होणार पूजा; सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

मुंबईतील जैन मंदिरात होणार पूजा; सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

पर्युषण काळात जैन मंदिरात पूजा करण्यास सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्या ट्रस्टला परवानगी दिली आहे. फक्त याचिकाकर्ता ट्रस्टच मुंबईतील तीन जैन मंदिरात केवळ दोन दिवसांसाठी पूजा करु शकणार आहे. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना केवळ २२ आणि २३ ऑगस्ट असे दोन दिवस मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिरात पूजा करण्याची मुभा दिली आहे.

राज्य सरकार आर्थिक गुंतवणूक असलेल्या प्रत्येक कामांना परवानगी देत आहे. पण, मंदिरांचा प्रश्न येताच कोविडचा धोका असल्याचे सांगितले जाते, अशा शब्दात सरन्यायाधीळ जस्टिस शरद बोबडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच श्री पार्श्वतिलक श्वेताम्बर मुर्तिपूजक तपागच्छ जैन ट्रस्टने पर्युषण काळात जैन मंदिरात पूजा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना केवळ २२ आणि २३ ऑगस्ट हे दोनच दिवस दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिरात पूजा करण्याची मुभा दिली आहे.

कोर्टाचे आदेश

‘आम्ही पर्युषण काळात उर्वरित दिवस दादर, भायखळा आणि चेंबूरच्या मंदिरात याचिकाकर्त्यांना प्रार्थना करण्यास परवानगी देतो. या आदेशानुसार ‘पर्युषण’ कालावधीचे दोन दिवस जैन मंदिरांत पूजा-अर्चा करण्यासाठी याचिकाकर्त्या-ट्रस्टला परवानगी देण्यात आली आहे. अन्य कोणत्याही ट्रस्ट किंवा कार्यक्रमास हा आदेश लागू नाही. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड संदर्भातील इतर नियमांचे पालन करण्याचे आदेश’, कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने मॉल आणि इतर आर्थिक उपक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरे उघडण्यास संमती दिलेली नाही. या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यावरील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.


हेही वाचा – ICMR ची माहिती; स्वॅबच्या जागी गुळण्या केलेल्या पाण्याचीही होऊ शकते कोरोना चाचणी


First Published on: August 21, 2020 5:39 PM
Exit mobile version