एकाच विमानावर पायलट मायलेकीचा फोटो व्हायरल

एकाच विमानावर पायलट मायलेकीचा फोटो व्हायरल

एकाच विमानावर पायलट म्हणून आई-मुलगी

लॉस एंजेलिस ते अटलांटा येथे प्रवास करणारे डेल्टा विमान एकाच कुटुंबातील सदस्यांनी उडवले असल्याचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. तसेच ही गोष्ट जेव्हा विमानात उपस्थित असणाऱ्या प्रवाशांना समजली तेव्हा विमानातील प्रवासी सुद्धा आश्चर्यचकित झाले. या विमानात पायलटच्या सिटवर आई आणि मुलगी असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पायलट आई-मुलीचा फोटो व्हायरल

दरम्यान, या विमानातील कॅप्टन पद हे आई सांभाळत आहे. त्यांचे नाव ‘वेंडी रेक्सन’ असे आहे. तर त्यांची मुलगी ‘केली रेक्सन’ ही फार्स्ट ऑफिसर (FO) या पदावर कार्यरत आहे. या घटनेचा फोटो डेल्टा विमानातील प्रवाशांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच त्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘फॅमिली फ्लाइट क्रू गोल्स’. तसेच या दोघी इतर महिलांना प्रेरित करत आहेत’, असेही लिहिले आहे. ट्विटरवर शेअर केलेला आई आणि मुलीचा फोटो ‘जॉन आर वेट्रट’ यांनी काढला आहे. मीडियाच्या अहवालातून समजले की, वेट्रट हे त्या विमानातील एक प्रवासी होते. त्या दोघींमधील संभाषणावरून त्यांना माहित झाले की, या दोघी एकाच कुटुंबातील आहेत. त्यानंतर त्यांनी त्या दोघींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांची इच्छा पूर्ण सुद्धा झाली. तसेच ‘केली रेक्सन’ची बहिणसुद्धा पायलट आहे, असे मीडियाच्या माहितीतून समोर आले आहे.

First Published on: March 25, 2019 10:08 PM
Exit mobile version