घरमनोरंजन'महाप्रयाण'ची लॉस एंजेलिस महोत्सवासाठी निवड

‘महाप्रयाण’ची लॉस एंजेलिस महोत्सवासाठी निवड

Subscribe

'महाप्रयाण' या चित्रपटाची निवड लॉस एंजेलिस महोत्सवासाठी झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण कट व रिटेक न घेता तब्बल १ तास ५० मिनिटांत झाले आहे.

गोवा चित्रपट महोत्सवासोबतच पाच महोत्सवांत ‘महाप्रयाण’ या चित्रपटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. याची आता लॉस एंजेलिस महोत्सवासाठी देखील निवड झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती अभय जोग, दिग्दर्शन नीलेश कारामुंगे तर सहदिग्दर्शन योगीराज भिसे यांनी केले आहे.

अनेक महोत्सवात चित्रपटाची निवड

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाची देशातील अनेक महोत्सवांत निवड झाली आहे, असे अभय जोग यांनी सांगितले. गोवा महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रकार तर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनाला द्वितीय क्रमांक, एनईझेड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, कलकत्ता इंटरनॅशनल कल्ट फिल्ममध्ये नवीन चित्रपट निर्माता पुरस्कार मिळाला आहे. लॉस एंजेलिसच्या महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे.

- Advertisement -

कट व रिटेक न घेता झाले चित्रीकरण

या चित्रपटाचे गोव्यातील सत्तरी-सावर्डे गोवा येथे चित्रीकरण झाले आहे. रेड ड्रॅगन कॅमेराद्वारे याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. कट व रिटेक न घेता तब्बल १ तास ५० मिनिटांचे चित्रीकरण केले असून, साडेचार किलोमीटरचा प्रवास या चित्रपटात मांडला आहे. याचे लेखन व दिग्दर्शन नीलेश करामुंगे, सहदिग्दर्शक योगीराज भिसे, छायाचित्रण समीर भास्कर, कार्यकारी निर्माता प्रवीण वानखेडे, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, संगीत दिग्दर्शन केदार, रंगभूषा लाला च्यारी, वेशभूषा रामा गावस, पोस्ट स्मिता फडके, लाइन निर्माता राजेश धुमे आहेत.

हेही वाचा – मराठी चित्रपटांत आता येणार ‘अरेंज मॅरेज’चा ट्रेंड!

‘व्हॉट विल पीपल से’ चित्रपटाची ऑस्कर २०१९ मध्ये एंट्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -