आता पासपोर्ट प्रकरणाला वेगळेच वळण

आता पासपोर्ट प्रकरणाला वेगळेच वळण

तन्वी शेठ आणि अनास सिद्दीकी (सौजन्य- फेसबुक)

मुस्लिम माणसाशी विवाह केला आता पासपोर्ट मिळवण्यासाठी धर्म बदला, असा अनुभव दिल्लीतील तन्वी शेठ आणि अनास सिद्दीकी यांना आला. धर्मभेद करत अधिकाऱ्याने पासपोर्ट नाकारल्याचा प्रकार तन्वीने ट्विट केला. त्यानंतर तिला तातडीने नवा पासपोर्ट देण्यात आला आणि दोषी अधिकारी विकास मिश्रा यांची बदली करण्यात आली. पण आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.

नियमाप्रमाणेच कागदपत्राची विचारणा

तन्वी शेठ यांचे पासपोर्टसाठीचे कागदपत्र विकास मिश्रा यांच्याकडे गेले. निकाहनाम्यावरील नाव आणि इतर कागदपत्रांवरील नावात वेगळे असल्यामुळे त्यांनी तन्वीला बोलावून निकाहनाम्यावरील नावाप्रमाणे तुम्ही अन्य कागदपत्रांमध्ये बदल करा असे सांगितले, पण नाव बदलण्यासाठी त्या तयार नव्हत्या, असे विकास मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. शिवाय पासपोर्ट हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कोणत्याही व्यक्तिचे काटेकोरपणे तपासणे आमचे काम आहे, असे केले नाही तर उद्या कोणीही कोणत्याही नावाने पासपोर्ट घेऊन जाईल. त्यामुळे नियमांप्रमाणेच तन्वी शेठ यांना कागदपत्राची विचारणा केली. त्यामुळे धर्म बदलाचा किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा संबंध नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले.


(दोषी अधिकारी विकास मिश्रा प्रसारमाध्यमांशी आपली बाजू मांडताना) 

वाचाधर्म बदला आणि पासपोर्ट घ्या’, दिल्लीत जोडप्याची कुचंबणा!

प्रकरण काय?

दिल्लीतील नोएडा भागात राहणाऱ्या तन्वी शेठ यांना नवा पासपोर्ट काढायचा होता. तर त्यांचे पती अनास यांना पासपोर्टचे नुतनीकरण करायचे होते. लखनऊच्या पासपोर्ट कार्यालयात गेल्यानंतर  ‘मुस्लिम माणसाशी विवाह केल्यामुळे धर्म बदलल्याशिवाय पासपोर्ट मिळणार नाही’ असे सांगण्यात आले..यावर विरोध करताच अनास यांना बोलावून त्यांची फाईल घेऊन, ‘तुम्ही तुमचा धर्म बदला, गायत्री मंत्र म्हणा आणि फेरे घ्या’ असे सांगण्यात आल्याची माहिती अनास यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवाय मिश्रा यांनी हे सांगताना उदधटपणा केल्याचे देखील अनास यांनीच सांगितले. पण असे काही झाले नसल्याचे अधिकारी मिश्रा यांनी सांगून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.

खरे आले समोर? 

काल दिवसभर या प्रकरणामुळे धर्मामुळे हे सारे झाल्याचे समजत होते. पण तन्वी शेठ आणि अनास यांनी  प्रसारमाध्यमांशी बोलताना जी काही वक्तव्य केली. त्यामुळेच त्यांच्यावरील संशय अधिक बळावला. आता नेमके या प्रकरणात कोण दोषी याचा अधिक तपास सुरु आहे.

First Published on: June 22, 2018 2:19 PM
Exit mobile version