घरदेश-विदेश'धर्म बदला आणि पासपोर्ट घ्या', दिल्लीत जोडप्याची कुचंबणा!

‘धर्म बदला आणि पासपोर्ट घ्या’, दिल्लीत जोडप्याची कुचंबणा!

Subscribe

भारत हा धर्मनिरपेक्ष असा देश असताना पासपोर्ट कार्यालयात मिळालेल्या या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या या जोडप्याने थेट परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांची मदत घेतली आणि एक संतापजनक प्रकार पुढे आणला. त्यांच्या या लढ्याला यश आले असून त्यांना नवा पासपोर्ट देण्यात आला आहे.

दिल्लीतील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टचं नुतनीकरण करायला गेलेल्या एका जोडप्याला अपमानाला सामोरे जावे लागले आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष असा देश असताना पासपोर्ट कार्यालयात मिळालेल्या या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या या जोडप्याने थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मदत घेतली आणि एक संतापजनक प्रकार पुढे आणला.

tanvi seth and anans siddique
अनास सिद्दीकी आणि तन्वी शेठ (सौजन्य- फेसबुक)

नेमंक काय घडलं ?

दिल्लीतील नोएडा भागात राहणाऱ्या तन्वी शेठ यांना त्यांच्या पासपोर्टचे नुतनीकरण करायचे होते. त्यासाठी त्यांनी लखनऊ येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे कार्यालय गाठले. यावेळी पासपोर्ट ऑफिसमध्ये त्यांना पासपोर्टचे नुतनीकरण करता येणार नाही असे सांगण्यात आले. कारण विचारल्यावर पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्रा यांनी तन्वी यांना ‘मुस्लिम माणसाशी विवाह केल्यामुळे धर्म बदलल्याशिवाय पासपोर्ट मिळणार नाही’ असे सांगितले. तन्वी यांनी २००७ साली अनास सिद्दिकी यांच्याशी विवाह केला. हिंदू-मुस्लिम असा हा विवाह होता. पण तन्वी यांनी धर्म बदलला नव्हता. पण अधिकाऱ्याने पासपोर्ट नुतनीकरण नाकारत अनीस यांनाच थेट त्यांचा धर्म आणि नाव बदलायला सांगितले. ‘हे सांगताना त्या अधिकाऱ्याने चार चौघात मुद्दाम आवाज चढवला, बराच वेळ बसवून ठेवले आणि सगळ्या लोकांसमोर आमचा अपमान केला’ असे या दोघांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisement -

अखेर मिळाला पासपोर्ट

तन्वी आणि अनीसने आवाज उठवल्यानंतर आता त्यांचा नवा पासपोर्ट मिळाला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिला आहे. त्यांच्यामुळे धर्माच्या नावाखाली कोणाची कुचंबणा होऊ नये,अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सुषमा स्वराज यांना केले ट्विट

२० जूनला हा सगळा प्रकार घडल्यानंतर तन्वी यांनी तातडीने झालेला सगळा प्रकार सुषमा स्वराज यांना ट्विट करुन सांगितला . या विषयाची गंभीर दखल घेत बुधवारी सकाळी या जोडप्याची विभागीय पासपोर्ट अधिकारी पियुष वर्मा यांनी भेट घेतली आणि दोषी अधिकारी मिश्रा यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

विकास मिश्रांनी  आरोप फेटाळला

धर्माचे कारण पुढे देत पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली  आणि दिवसभर गदारोळ माजला. पण होणारे आरोप-प्रत्यारोप थांबण्यासाठी विकास मिश्रा प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त झाले आहेत. त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठीच्या पहिल्या दोन फेऱ्या यशस्वीरित्या पार केल्या. ज्यावेळी ते विकास मिश्राकडे तिसऱ्या फेरीसाठी आले. त्यावेळी निकाहनाम्यावर असलेल्या नावाची कागदपत्रे आणण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. नियमानुसार मी त्यांच्याकडून कागदपत्रांची विचारणा केल्याचे अधिकारी मिश्रा यांनी म्हटले आहे. मिश्रांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळल्यामुळे आता नेमके खरे काय ? याचा अधिक तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -