सहाव्या दिवशी हार्दिक पटेलचे आमरण उपोषण सुरुच

सहाव्या दिवशी हार्दिक पटेलचे आमरण उपोषण सुरुच

हार्दिक पटेलचा उपोषणचा सहावा दिवस

पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल गेल्या ६ दिवसापासून आमरण उपोषण करत आहे. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी हार्दीक पटेल आमरण उपोषण करत आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी हार्दिक पटेल याने जल त्याग केला आहे. अमरण उपोषणामुळे हार्दीक पटेलचे ५ किलो वजन कमी झाले असून शरीरात पाणी कमी पडल्यामुळे युरीन इन्फेक्शन झाले आहे.

गुजरातमध्ये जनतेचा आवाज दाबला जातोय

हार्दीक पटेलने ट्विट करुन इशारा दिला आहे की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, “लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज कोणतेही सरकार दाबू शकत नाही. जर जनतेच्या आवाजाला दाबले तर मोठा विस्फोट होईल. गुजरातमध्ये ज्याप्रकारे जनतेचा आवाज दाबला जात आहे. त्याविरोधात मी दावा करुन सांगतो की, सरकारच्याविरोधात जनता विस्फोट करेल.”

शेतकऱ्यांसाठी तुला लढायचे आहे – हार्दिकचे आजोबा

हार्दिक पटेल ज्या ठिकाणी उपोषण करत आहे त्याठिकाणी त्याचे आजोबा भेटायला आले होते. त्यासंदर्भात त्यांनी भावनिक ट्विट करत सांगितले, “आज आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी माझे आजोबा गावावरुन मला भेटायला आहे. मला पाहून आजोबा दुखी झाले त्यांच्या डोळ्यात पाणी होते. पण त्यानंतर त्यांनी सांगितले बाळा तू लढ, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. गेलेला आमचा काळ चांगला होता मात्र येणारा काळ खूप खराब आहे. तुला लढायचे आहे. देशाचा अन्नदाता गरीब आणि लाचार झाला आहे. मात्र आता शांत बसणार नाही.” असे ट्विटमध्ये हार्दिक पटेल याने सांगितले आहे.

अहमदाबादमध्ये जमावबंदी लागू

पाटीदार समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने जाहीर न केल्यामुळे हार्दिक पटेल २५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसला आहे. ऑगस्ट २०१५ला पाटीदार समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. ते पाहता प्रशासन यावेळी कोणतिही जोखीम उचलायची नाही. त्यामुळे अहमदाबादमध्ये १४४ कलम म्हणजे जमाबंदी लागू करण्यात आली आहे. हार्दिक पटेलच्या घराच्या आसपास पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहमदाबादच्या पाटीदार समाजाच्या परिसरावर देखील पोलिसांची कडी नजर आहे.

First Published on: August 30, 2018 10:14 PM
Exit mobile version