Imran Khan no trust vote: पाकिस्तान क्रिकेटमध्येही भूकंप होणार? रमीज राजांचे PCB अध्यक्षपद जाण्याचे संकेत

Imran Khan no trust vote: पाकिस्तान क्रिकेटमध्येही भूकंप होणार? रमीज राजांचे PCB अध्यक्षपद जाण्याचे संकेत

पाकिस्तानात इम्रान खान सरकार पडल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये पाकिस्तान क्रिकेटमध्येही मोठे फेरबदल दिसण्याचे संकेत आहेत. पाकिस्तानातील जिओच्या रिपोर्टनुसार इमरान खान सरकार कोसळल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष रमीज राजा हेदेखील आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. सध्या रमीज राजा हे आयसीसीच्या मिटिंगसाठी दुबई येथे आहेत. याठिकाणी चार देशांच्या सुपर सिरीजच्या प्रस्तावासाठी ते पोहचले आहेत. या सिरीजमध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यासारखे देश सहभागी होऊ शकतात.

भारतासोबतच BCCI वर साधला होता निशाणा

रमीज राजा हे पीसीबी अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय क्रिकेटवर निशाणा साधला होता. पीसीबीने बीसीसीआयसमोर सिरीजचा प्रस्ताव ठेवला असल्याचे म्हटले होते. त्यावर भारताने आपल्या देशात विचारणा करून सरकारच्या सल्ल्यानंतरच बोलणी करू असे उत्तर दिले होते. पीसीबीने भारताच्या भूमिकेवर मत मांडत आमच्यावरही दबाव असल्याचे सांगितले होते. तसेच आम्हीही देशात सिरीजबाबत बोलण करत असल्याचे स्पष्ट केले होते.

पाकिस्तानात माजी खेळाडू आणि पायउतार झालेल्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या अविश्वास ठरावानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतरही इम्रान खान यांनी आपल्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे पीटीआयकडून शाह महमूद कुरैशी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून शहबाज शरीफ यांच्या नावे पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून कागदपत्र संसदेत जमा करण्यात आली आहेत.


 

First Published on: April 10, 2022 4:25 PM
Exit mobile version