पर्यटनासाठी जाताय तर कोरोना नियमांचे पालन करा, नाहीतर पुन्हा निर्बंध होऊ शकतात लागू; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

पर्यटनासाठी जाताय तर कोरोना नियमांचे पालन करा, नाहीतर पुन्हा निर्बंध होऊ शकतात लागू; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

पर्यटनासाठी जाताय तर कोरोना नियमांचे पालन करा, नाहीतर पुन्हा निर्बंध होऊ शकतात लागू; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

कोरोनाची दुसरी लाट मंदावल्यामुळे आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे लोकं आता पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. यादरम्यान मनाली, शिमला सारख्या हिल स्टेशनवरून असे फोटो समोर आले आहेत की, ज्यामध्ये लोकं मास्क न घालताना आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारने सांगितले आहे की, जर लोकं नियमांचे पालन काटेकोरपणे करत नाही तर पुन्हा एकदा निर्बंधात आणलेली शिथिलता दूर करू म्हणजेच निर्बंध लागू करू. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव्ह अग्रवाल यांनी दिली आहे.

लव्ह अग्रवाल पुढे म्हणाले की, ‘लोकं हिल स्टेशनवर जाऊ लागले आहेत. कोरोना नियमांचे लोकं पालन करत नाही आहेत. जर असं असेल तर आम्ही पुन्हा एकदा आतापर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले होते ते मागे घेऊ. कोरोनाची दुसरी लाट अजूनही गेली नाही आहे. अजूनही ती मर्यादित स्वरुपात आपल्यामध्ये आहे.’

देशातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी आरोग्य मंत्रालयाने अशी अपडेट दिली की, २४ ते ३० मार्च दरम्यान पॉझिटिव्ही दर २१.३ पर्यंत चढला होता. तेव्हा दररोज सरासरी १०.५ लाख चाचण्या केल्यात जात होत्या. आता पॉझिटिव्ही दर २.७ टक्क्यांपर्यंत असूनही चाचण्यांचे प्रमाण तेवढेच आहे. देशात ८० टक्के नवीन रुग्ण ९० जिल्ह्यांमध्ये नोंदले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे १५ जिल्हे आहेत. याचा अर्थ असा की, आता संसर्ग स्थानिक पातळीवर मर्यादित भौगोलिक क्षेत्रापुरता वाढत असून, त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज उत्पन्न झाली आहे.

देशातील कोरोनामुक्तीचा दर आता ९७. २ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून, दैनंदिन कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. तसेच दैनंदिन रुग्णसंख्या शंभरपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ४ मे २०२१ रोजी संपलेल्या आठवड्यात ती संख्या ५३१ होती, ४ जून रोजी २६२ तर त्या नंतरच्या महिन्याभरात त्या जिल्ह्यांची संख्या ९१ इतकी झाली.


हेही वाचा – world most expensive fruit: जगातील सर्वात महागड्या फळांची किंमत वाचून चकीत व्हाल!


 

First Published on: July 6, 2021 5:57 PM
Exit mobile version