Video : ‘पाऊस असो वा वारा..आम्ही नाही जाणार’, गारपीट असतानाही दारुसाठी रांगा!

Video : ‘पाऊस असो वा वारा..आम्ही नाही जाणार’, गारपीट असतानाही दारुसाठी रांगा!

नैनीतालमध्ये दारूसाठी रांगा

३ मेपासून देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आला. त्यामुळे राज्यांनी आर्थिक व्यवस्था ढासळू नये यासाठी दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आणि दारूच्या दुकानापुढे लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी दारू घेताना यावेळी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचाही विसर पडला. दारूची दुकानं उघडणार म्हणून तळीरामांनी लांबच लांब रांगा लागल्याचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात एक नैनितालच्या तळीरामांचा व्हिडिओ देखील होता.

नैनितालमध्ये मंगळवारी तुफान गारांचा पाऊस पडला. मात्र पाऊस असो वारा असं म्हणत तळीरामांनी छत्री घेऊन दुकानांसमोर रांगा लावल्या. नैनितालमधील मॉल रोडवरील हा व्हिडिओ आहे. नैनितालमध्ये मंगळवारी गारपीट झाली. मात्र अशा परिस्थितीमध्येही लोकं दारुच्या रांगेत उभी असल्याचे चित्र दिसले. पण या वेळी रांगेतल्या लोकांनी मात्र मद्य खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

राज्यात लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात अधिकृत परवाना असलेल्या दुकानदारांना दारू विक्री करण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली. ३ मेपर्यंत राज्यात दारूची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांना मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र सोमवारपासून राज्यात काही ठिकाणी दारूची दुकाने उघडण्या आधीच तळीरामांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी गर्दी नियंत्रणा बाहेर होत असल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला. तर काही शहरात आणि जिल्ह्यात स्थानिक आधिकाऱ्यांनी दारू विक्री करण्यास परवानगी दिली नसल्याचे पाहायला मिळाले.


हे ही वाचा – पायी चालत निघालेल्या मजूराचा रस्त्यातच मृत्यू, ४ तास मृतदेह एकाच जागी पडून


 

First Published on: May 6, 2020 10:06 PM
Exit mobile version