घरCORONA UPDATELockdown: पायी चालत निघालेल्या मजूराचा रस्त्यातच मृत्यू, ४ तास मृतदेह एकाच जागी...

Lockdown: पायी चालत निघालेल्या मजूराचा रस्त्यातच मृत्यू, ४ तास मृतदेह एकाच जागी पडून

Subscribe

लॉकडाऊनमुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळलेले हजारो कामगार पुन्हा आपल्या घराकडे परतण्यासाठी कुटुंबासह मुंबई नाशिक महामार्गावरुन ऊन्हातान्हात पायी प्रवास करत आहेत. यातील बहुतांश उत्तर प्रदेशातील कामगार आहेत. दुर्दैवाने पायी निघालेल्या एका कामगाराचा बुधवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगाव नजीक या कामागाराचा मृत्यू झाला. दुपारी साधारण ३ वाजल्यापासून कामगाराचा हा मृतदेह तब्बल चार तास तेथेच पडून असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले. मृतदेह तेथेच पडून असून देखील शहापुरमधील सरकारी यंत्रणा घटनास्थळी वेळेवर पोहचली नसल्याने सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार या घटनेनंतर समोर आले आहे.

देशात विविध राज्यांमध्ये आतापर्यंत शेकडो मजुरांचा पायी चालत जाताना रस्त्यातच मृत्यू झालेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या मुजरांची निश्चित आकडेवारी नसली तरी लॉकडाऊन घोषित झाल्यापासून रोजच अशाप्रकारच्या घटना कुठेतरी घडत आहेत. मार्च महिन्यात मुंबईतून गुजरातला पायी निघालेल्या मजुरांच्या एका ग्रुपला अहमदाबाद महामार्गावर एका गाडीने उडवले होते. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा आज मंत्रीमंडळाने घेतला. कालपर्यंत महाराष्ट्रातून १५ आणि आज रात्री १० अशा २५ ट्रेन्स आत्तापर्यंत कामगारांना घेऊन इतर राज्यात गेल्या आहेत अशी माहिती अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांनी दिली. पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही दोन राज्ये वगळता इतर राज्यांशी पार पडलेल्या चर्चेनुसार त्या राज्यांचे कामगार पाठविण्यास सुरुवात झाली आहे. देशात आत्तापर्यंत १०० रेल्वे या श्रमिकांची वाहतूक करीत असून महाराष्ट्रातून २० टक्के श्रमिकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती ही बैठकीत देण्यात आली.

महाराष्ट्रातून स्वत:च्या वाहनाने इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार इ पासेस देण्यात आले आहेत. एसटी बसेसचे नियोजन ही वाहतुकीच्या दृष्टीने पुढील काळासाठी तयार आहे असे डॉ करीर यांनी सांगितले. परराज्यांतील लोकांप्रमाणे राज्यांतर्गत अडकलेल्या लोकानांही आपाप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -