Petrol-Diesel: पेट्रोल गाठणार शंभरी; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel: पेट्रोल गाठणार शंभरी; जाणून घ्या आजचे दर

मागील दोन आठवडे पेट्रोल डिझेलच्या किंमती जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एकीकडे महागाईमुळे नागरिक आधीच हैराण झाले असताना दुसरीकडे दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दररोज वाढणारे पेट्रोलचे दर आता शंभरी गाठणार असल्याचे दिसून येत आहे. आज देखील मुंबईत पेट्रोलचा भडका उडाला असून मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपये झाले आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८८.४४ पैसे इतका आहे. (Petrol-Diesel Price)

पॉवर पेट्रोल १०० रुपये

गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच दर स्थिरावले आहेत. त्यात कोणतेही बदल झालेले नाहीत. मात्र, आज पॉवर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पॉवर पेट्रोलचे दर १००.११ पैसे झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दररोज ३० पैशांपर्यंतही वाढ होत असल्याने पेट्रोल, डिझेलचे दररोज दर वाढत आहेत. मात्र, बुधवार आणि गुरुवार, असे दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली : ९०.९३ रुपये प्रति लिटर
मुंबई : ९७.३४ रुपये प्रति लिटर
कोलकाता : ९१.१२ रुपये प्रति लिटर
चेन्नई : ९२.९० रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली : ८१.३२ रुपये प्रति लिटर
मुंबई : ८८.४४ रुपये प्रति लिटर
कोलकाता : ८४.२० रुपये प्रति लिटर
चेन्नई : ८६.३१ रुपये प्रति लिटर


हेही वाचा – देशात जॉन जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या तिसऱ्या लसीला मंजुरी मिळणार ?


 

First Published on: February 25, 2021 9:53 AM
Exit mobile version