Petrol Diesel Price: तीन महिन्यानंतर डिझेलच्या किंमतीत घट, परंतु पेट्रोलची किंमत वाढली

Petrol Diesel Price: तीन महिन्यानंतर डिझेलच्या किंमतीत घट, परंतु पेट्रोलची किंमत वाढली

Petrol Diesel Price: तीन महिन्यानंतर डिझेलच्या किंमतीत घट, परंतु पेट्रोलची किंमत वाढली

सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) आज, सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत वाढ केली असून डिझेलच्या किंमतीत घट केली आहे. पेट्रोलच्या किंमतीत २८ पैशांची वाढ केली असून डिझेलच्या किंमतीत १६ पैशांची घट झाली आहे. परवा तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत ३५ पैशांची वाढ केली होती. तसेच यासोबत डिझेलच्या किंमतीत प्रत्येक लीटरवर २६ पैशांची वाढ केली होती. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) पेट्रोलच्या मागणीत (Demand of Petroleum Fuels) जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे कच्च्या बाजारात (Crude Oil Market) पुन्हा एकदा तेजी निर्माण झाली आहे.

आज किंमतीत वाढ केल्यानुसार, दिल्लीच्या बाजारात (Delhi Market) इंडियन ऑईल (IOC)च्या पंपावर पेट्रोल १०१.१९ रुपये प्रति लीटर झाले असून डिझेल ८९.७२ रुपये प्रति लीटर झाले आहे. काल डिझेल ८९.८८ रुपये प्रति लीटर होते.

जेव्हा देशात महत्त्वपूर्ण निवडणूक असते तेव्हा पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढत नाही. मार्च आणि एप्रिलमध्ये अनेक राज्यात विधानसभा निवडणूक असल्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. कच्च्या तेलाचे दर वाढूनही यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. परंतु ४ मेपासून इंधन दरात वाढ होऊ लागली. ४० दिवसांत पेट्रोल १०.८७ रुपये प्रति लीटरने महागले.

तीन महिन्यानंतर डिझेल किंमतीत घट

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारीला अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी २७ फेब्रुवारीला डिझेलच्या किंमतीत १७ पैशांची वाढ केली होती. त्यानंतर दोन महिन्यांहून अधिक दिवसांमध्ये डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. १५ एप्रिलला डिझेलच्या किंमतीत १४ पैशांची किरकोळ कपात झाली होती. निवडणुकीनंतर ४ मेपासून डिझेलच्या किंमतीत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. बघायचे झाले तर, जेव्हा पेट्रोलचे दर वाढतात, तेव्हा डिझेलचे दर वाढतात. पण आज पेट्रोलचा दर वाढला, मात्र डिझेलचा स्थिर राहिला आहे. जवळपास तीन महिन्यानंतर डिझेलच्या प्रति लीटर किंमतीत १६ पैशांची कमी झाली आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

दिल्ली –       पेट्रोल – १०१.१९ प्रति लीटर, डिझेल – ८९.७२ प्रति लीटर
मुंबई –         पेट्रोल – १०७.२० प्रति लीटर, डिझेल – ९७.२९ प्रति लीटर
चेन्नई –         पेट्रोल – १०१.९२ प्रति लीटर, डिझेल – ९४.२४ प्रति लीटर
कोलकाता –   पेट्रोल – १०१.३५ प्रति लीटर, डिझेल – ९२.८१ प्रति लीटर
भोपाळ –      पेट्रोल – १०९.५३ प्रति लीटर, डिझेल – ९८.५० प्रति लीटर
रांची –         पेट्रोल – ९६.१८ प्रति लीटर, डिझेल – ९४.६८ प्रति लीटर


हेही वाचा – दिल्लीत पहिल्यांदा FASTag कार पार्किंग सुरू; टोल प्लाझाप्रमाणे सेकंदात भरले जाणार पैसे


First Published on: July 12, 2021 9:33 AM
Exit mobile version