Petrol-Diesel Price: 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपये प्रति लीटर महागले; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price: 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपये प्रति लीटर महागले; जाणून घ्या आजचे दर

देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून ते आतापर्यंत 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपये प्रति लीटरने महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज 3 एप्रिलला राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दरात 80 पैसे प्रति लीटर वाढ केली आहे.

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 118 रुपये प्रति लीटर झाले असून आता डिझेलनेही शंभरी पार केली आहे. डिझेल आता 102 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत आता 103.41वर पोहोचली आहे. तर डिझेल 95 रुपये प्रति लीटर झाले आहे.

IOCLनुसार, राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आता 120.96 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल 103.51 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे

शहराचे नाव           पेट्रोल             डिझेल
दिल्ली                103.41         94.67
मुंबई                  118.41         102.64
कोलकाता            113.03         97.82
चेन्नई                  108.96         99.04

दरम्यान स्थानिक करांनुसार राज्यातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत निश्चित होते. देशातील चार महानगरांची जर तुलना केली तर मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग आहे.

पुढील निवडणुकीपर्यंत २७५ रुपये प्रति लीटर पेट्रोल होणार!

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दराच्या अनुषंगाने केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले की, ‘पुढील निवडणुका येईपर्यंत पेट्रोलची किंमत २७५ रुपये प्रति लीटर होईल. तसेच जनता म्हणत आहे की, ८० पैसे प्रतिदिन किंवा सुमारे २४ रुपये महिन्याच्या हिशोबाने पेट्रोलचे दर असेच वाढत राहिले तर पुढील निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील. यादरम्यान ७ महिन्यात दर जवळपास १७५ रुपयांनी वाढतील.’


हेही वाचा – मार्चमध्ये विक्रमी 1.42 कोटी रुपयांचा कर जमा


 

First Published on: April 3, 2022 8:07 AM
Exit mobile version