पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, हे आहेत नवीन दर!

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, हे आहेत नवीन दर!

लॉकडाऊनचा ५ वा टप्पा देशातील लोकांच्या खिशाला परवडणारा नाहीये असच दिसतय. या काळात लॉकडाऊनमध्ये संभाव्य सूट मिळाली तरी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. तब्बल अडीच महिन्यांनंतर पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल करण्यात आला. कच्च्या तेलाचे दरही ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत.

लॉकडाउनच्या कालावधीत पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली होती. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील व्हॅटमध्ये दिल्ली सरकारसह देशातील अनेक राज्यांनी वाढ केली आहे.  यापूर्वी काही राज्य सरकारांनी महसूलात वाढ करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरी वॅट अथवा सेसच्या दरात बदल केले होते.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. त्याचा परिणाम क्रूड तेलाच्या किंमतींमध्ये दिसून येत आहे. मागील महिन्याच्या मते, मे महिन्यात ब्रेंट क्रूडच्या किंमतीत ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी काळात क्रूड तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढलेली दिसून येईल.

अशी झाली वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ८० दिवसांनी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोलवरी उत्पादन शुल्क वाढून २२.९८ रूपये प्रति लीटक आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून १८.८३ रूपये प्रति लीटर करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईत आता पेट्रोल ७८. ९१ रूपये आणि डिझेल ६९.७९ रूपये वाढ झाली आहे. तर नवी दिल्लीत पेट्रोल ७१.८६ रूपये आणि डिझेल ६९.९९ रूपये  करण्यात आले आहे. तर हैदराबादमध्ये पेट्रोल ७४. ६१ रूपये आणि डिझेल ६८.४२ रूपये भाव आहे.


हे ही वाचा – ‘XXX 2’: ‘हिंदूस्थान भाऊने मला बलात्काराची धमकी दिली आहे….’


 

First Published on: June 7, 2020 2:59 PM
Exit mobile version