पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, मुंबईतील इंधनाचे दर जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, मुंबईतील इंधनाचे  दर जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, मुंबईतील इंधनाचे दर जाणून घ्या

देशात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भाव कमी झाले होते. तेल कंपन्यांकडून पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी आज इंधन दरात कोणताही बदल केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरात घट केल्यामुळे देशात पेट्रोलची किंमत ९ रुपयांनी तर डिझेलमध्ये ७ रुपयांची घट झाली होती.

पेट्रोलियम कंपन्यांनी नवे दर जारी केले आहेत. यानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा प्रति लीटर भाव ९६.७२ रुपये आहे. तर डिझल ८९.६२ रुपये प्रति लीटर मिळत आहे. कोलकातानंतर मुंबईत सर्वाधिक पेट्रोलचा भाव आहे. पेट्रोल ११.३५ तर डिझल ९७.२८ रुपये मुंबईत आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ तर डिझलची किंमत ९२.७६ रुपये प्रति लीटर आहे. तसेच चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लीटर आणि डिझल ९४.२४ लीटर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दराचा आढावा घेऊन ऑईल मार्केटिंग कंपन्या इंधन दर रोज ठरवत असतात. देशात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्या दरदिवशी पहाटे प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेलच्या दरांची माहिती अपडेट करत असतात.

केंद्र सरकारने २१ मे २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील अबकारी कर कमी केला होता. सरकारच्या निर्णय़ामुळे पेट्रोलच्या दरात ८ तर डिझेलच्या दरात ६ रुपये अबकारी कर माफ केला होता. यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर घटले आहेत.

राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक पेट्रोलचा दर

राज्यातील प्रमुख शहरांपैकी मुंबईच्या तुलनेत नागपूरमध्ये पेट्रोलचा दर जास्त आहे. मुंबईत पेट्रोल ११३.३५ रुपये आणि डिझेल ९७.२८ रुपये आहे. पुण्यात पेट्रोल १११.३० रुपये तर डिझेल ९८ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १११.२५ तर डिझेल ९५.७३ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव १११.४१ रुपये आहे. तर डिझेलचा भाव ९५. ७३ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये १११.०२ आणि डिझेलचा दर ९५.५४ रुपये आहे.


हेही वाचा : राष्ट्रपतिपदासाठी राजकारणाबाहेरचा उमेदवार हवा, पवारांच्या नकारानंतर विरोधकांच्या बैठकीत शिवसेनेची भूमिका

First Published on: June 16, 2022 8:01 AM
Exit mobile version