LPG Gas cylinder: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ

LPG Gas cylinder: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ

वर्षाच्या अखेरिस आणि डिसेंबरच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी मध्यवर्गीयांना मोठा धक्का बसला आहे. १ डिसेंबरला शासकीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये १०३.५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आता १९ किलो सिलेंडरच्या किंमतीमध्ये १०० रुपयांची वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी होतील असा नागरिकांचा विश्वास होता परंतु किंमती कमी होण्यापेक्षा वाढल्या असल्यामुळे व्यावसायिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमतीमध्ये आजपासून १०३.५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आता इथे व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती २१०१ रुपये झाल्या आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती १४.२ किलोच्या गॅसमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. परंतु व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ केल्यामुळे याचा बोझा हॉटेल मालकांवर येणार आहे. यामुळे हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता आहे. हॉटेल मालक मेन्यूमधील किंमती वाढवून पैसे वसुल करत असतात म्हणून हॉटेलमधील जेवण आता महाग होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महागाई कमी करण्यात येईल असे नागरिकांना वाटत होते परंतु पेट्रोलियम कंपन्यांनी किंमती वाढवून सर्वसामान्यांना चांगलाच झटका दिला आहे.

मुंबईतील व्यावसायिक सिलेंडरचा दर किती?

पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरचा दर २१०० रुपये झाला आहे. दिल्लीत दोन महिन्यांपूर्वी १,७३३ रुपये १९ किलो सिलेंडरचा दर होता. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर २०५१ रुपये झाला आहे. कोलकातामध्ये इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. तर सर्वाधिक महाग गॅस सिलेंडर हा चेन्नईमध्ये आहे. १९ किलो गॅस सिलेंडर २२३४ रुपये झाला आहे.


हेही वाचा :  Mumbai Rains : मुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी


 

First Published on: December 1, 2021 11:45 AM
Exit mobile version