कोरोना लसीने घेतले १३ जणांचे प्राण

कोरोना लसीने घेतले १३ जणांचे प्राण

कोरोना लसीने घेतले १३ जणांचे प्राण,

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संकटाचा फटका जगभरातील देशांना बसला. त्यानंतर हे संकट रोखण्यासाठी बऱ्याच देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. काही देशांमध्ये या कोरोना लसीकरणानंतरचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे. युरोपातील नॉर्वेमध्येही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लसीकरणास सुरुवात झाली. यामध्ये २९ जणांना लसीनंतरचे साईट इफेक्ट दिसू लागले असून यामध्ये १३ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना नॉर्वेत घडली आहे. सध्या या देशात नागरिकांना फायझरची लस (Corona Pfizer Vaccine) दिली जात आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये सुरु असलेल्या लसी मोहिमेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नॉर्वे सरकारकडून आधीच माहिती देण्यात आली होती की, लस टोचल्यानंतर तिचे साईट इफेक्ट्स दिसतील. त्याप्रमाणे नॉर्वेच्या औषध संस्थेचे प्रमुख वैद्यकीय संचालक स्टेइनार मॅडसेन यांनी देशातील वृत्त वाहिनीला यासंदर्भात संवाद साधला. ज्यात त्यांनी ‘आतापर्यंत कोरोना लस देण्यात आलेल्या २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १३ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ९ जणांना गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट्स जाणवले. तर ७ जणांमध्ये आढळून आलेल्या साईड इफेक्ट्सचं स्वरुप गंभीर नव्हतं,’ अशी माहिती दिली.

या लसीकरणानंतर मृत्यू पावलेल्या नागरिकांबद्दल माहिती देताना मॅडसेन सांगतात, लस टोचण्यात आल्यानंतर मृत्यू पावलेल्या नागरिकांची तपासणा केली. ज्यामध्ये सगळेजण वयस्कर होते. त्यांचे वय ८० च्या पुढे असून या व्यक्ती आजारी होत्या. त्यांनी लस दिल्यानंतर तापसोबतच अस्वस्थतेचा सामना करावा लागला ज्यात त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. मात्र देशातील इतर हजारो नागरिकांना लस देण्यात आली ज्यामध्ये गंभीर आजाराशी सामना करणारे तसेच संबंधित आजार, डिमेन्शिया यासह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा समावेश होता. मात्र त्यांना कोणताही धोका जाणवला नाही, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

 


हेही वाचा- मुंबईत आज कोरोना लसीकरणाचा तिसरा ड्राय रन

First Published on: January 15, 2021 8:19 PM
Exit mobile version