Corona Vaccination: आता १२ वर्षाखालील वयोगटाच्या मुलांनाही कोरोनाची लस; Pfizerने सुरू केली चाचणी

Corona Vaccination: आता १२ वर्षाखालील वयोगटाच्या मुलांनाही कोरोनाची लस; Pfizerने सुरू केली चाचणी

Corona Vaccination: आता १२ वर्षाखालील वयोगटाच्या मुलांनाही कोरोनाची लस; Pfizerने सुरू केली चाचणी

जीवघेण्या कोरोना विषाणूच्या लढाईत लस ही महत्त्वाची अस्त्र आहे. त्यामुळे सध्या जगभरात सर्व वयोगटातील नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांचे लसीकरण व्हावे अशी इच्छा आहे. अनेक देशांमध्ये १८ वर्षावरील वयोगटाचे लसीकरण सुरू केले आहे. यामुळे आता कोरोना लस तयार करणारी अमेरिकन कंपनी फायझर (Pfizer)ने १२ वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांवर आपल्या लसीची चाचणी करण्यास केली आहे. पहिल्या टप्प्यात कमी संख्येत छोट्या मुलांना लसीचे वेगवेगळे डोस दिले जातील. १२ वर्षाखालील वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यासाठी फायझरने जगातील ४ देशांमधील ४ हजार ५०० हून अधिक मुलांची निवड केली आहे. या ४ देशांमध्ये अमेरिका, फिनलँड, पोलँड आणि स्पेनचा समावेश आहे.

चाचणीच्या पहिल्या टप्प्यात लसीच्या एका छोट्या डोसची निवड केली जाईल त्यानंतर १२ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना एका मोठ्या गटात कोरोना लसीकरणाची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे, असे अमेरिकन कंपनी फायझरने माहिती दिली आहे.

दरम्यान यापूर्वी अमेरिका आणि युरोपमध्ये १२ वर्षावरील मुलांना फायझरची लस देण्यास मंजूरी दिली आहे. आपात्कालीन वापरासाठी ही मंजूरी देण्यात आली आहे. फायझर कंपनीने कोरोना लस जर्मन पार्टनर बायोएनटेकसोबत मिळून केली होती. तसेच फायझर कंपनीच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेतून सर्वात पहिल्यांदा मंजूरी मिळाली होती.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाच्या चाचणीसाठी या आठवड्यात ५ ते ११ वर्षांच्या मुलांची निवड करण्याचे काम सुरू केले जाईल. या मुलांना १० मायक्रोग्रामचे दोन डोस दिले जातील. हा लसीचा डोस किशोरवयीन आणि प्रौढांना देण्यात आलेल्या लसीच्या डोसच्या एक तृतीयांश असेल. दरम्यान काही आठवड्यानंतर ६ महिन्यापासून अधिक वय असलेल्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली जाईल. त्यांना ३ मायक्रोग्राम लस दिली जाईल.

फायझर व्यतिरिक्त मॉडर्ना कंपनीसुद्धा १२ ते १७ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करत आहे. लवकरच याच्या परिणामाचा अहवाल समोर येणार आहे. एफडीएने दोन्ही कंपनीचे आतापर्यंत आलेल्या परिणामाचे अहवालावर विश्वास ठेवून ११ वर्षापर्यंतच्या मुलांवर लसीची चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यात एस्ट्रोजेनेकाने ६ ते १७ वर्षापर्यंतच्या मुलांवर ब्रिटनमध्ये अभ्यासास सुरुवात केली होती. तसेच जॉनसन अँड जॉनसन कंपनीने सुद्धा हा अभ्यास सुरु केला आहे. पण यादरम्यान चीनच्या सिनोवॅकने ३ वर्षावरील मुलांवर आपली लस असरदार असल्याचा दावा केला आहे.


हेही वाचा – Covid-19 : भविष्यात मुलांमध्ये गंभीर संक्रमण होणार नाही – डॉ. रणदीप गुलेरिया


 

First Published on: June 9, 2021 8:11 AM
Exit mobile version