CoronaVirus: देशात ५८ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार! – अमरिंदर सिंग

CoronaVirus: देशात ५८ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार! – अमरिंदर सिंग

कोरोना व्हायरसमुळे पंजाबची परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याबाबत शुक्रवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं की, जुलै-ऑगस्टपर्यंत कोरोना विषाणूचा प्रसार भारतात शिगेला पोहोचणार आहे, असा अंदाज वैज्ञानिक आणि वैद्यकीय विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशात सुमारे ५८ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली. तसंच पंजाबमध्ये जवळपास ८७ टक्के लोकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी राज्यात लॉकडाऊन काढण्याची योग्य वेळ नसल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे निर्णय घेतला. पंजाबमधील १ मे पर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संकटात १५ हजार कोटी रुपयांचे दिलेले पॅकेज अपुरे आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने राज्य सरकारला पुरेशी आर्थिक मदत पुरविली पाहिजे.

अमरिंदर सिंग या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांना सांगितलं की, आम्ही लॉकडाऊन केले त्यानंतर कर्फ्यू लावला. मग लोकांपर्यंत अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था केली. आमचे लोक प्रत्येक भागात जाऊन लोकांना अत्यावश्यक वस्तू पुरवित आहेत.

पुढे ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर जवळपास दीड लाख लोक परदेशातून पंजाबमध्ये आले. आम्ही त्यांचा तपासणी केली असून त्यांना वेगळे ठेवले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून १३२ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यातील ११ कोरोना रुग्णांचे बळी गेले आहेत. एकूण २ हजार ८७७ लोकांची तपासणी करण्यात आली आहे, असं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाचा सामुहिक संसर्ग भारतात होत नाही; WHOने चूक केली मान्य


 

First Published on: April 10, 2020 7:18 PM
Exit mobile version