PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आता 2000 रुपये; कसे ते जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आता 2000 रुपये; कसे ते जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, कसे ते जाणून घ्या

केंद्र सरकारद्वारे आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे. केंद्र सरकारने प्रत्येकी 2000 रुपयांचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. हा 10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी पाठवला होता. यामध्ये 10.09 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 20,900 कोटी रुपये देण्यात आले होते.

पीएम किसान योजना नेमकी काय आहे? (What Is PM Kisan Samman Nidhi Yojana?)

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा केली जाते. हे हप्ते चार महिन्यांनी जमा होतात म्हणजे वर्षातून तीनदा 2000- 2000 रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पाठवले जातात. केंद्र सरकारद्वारे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातात.

योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले अशी आहे. म्हणजे अशाप्रकारची कुटुंब पद्धती असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरु झाली आहे. भारत सरकारच्या 100 टक्के निधीसह ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. या योजनेच्या हप्त्यांचे वर्ष तीन कालावधीत विभागले गेले आहे- एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च.

पुढचा हप्ता कधी येणार?

डिसेंबर ते मार्च या कालावधीतील 10 वा हप्ता जानेवारी 1 मध्ये जमा झाला आहे. त्यामुळे आता एप्रिल- जुलैदरम्यानचा 11वा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा केला जाईल अशी अपेक्षा आहे. सहसा हा हप्ता कार्यकाळाच्या पहिल्या महिन्यात ट्रान्सफर केला जातो. यापूर्वी 9वा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये जारी करण्यात आला होता.


धनुषची कार्बन कॉपी ! घटस्फोटानंतर अभिनेता मुलासोबत घालवतोय क्वॉलिटी टाइम


First Published on: February 17, 2022 2:34 PM
Exit mobile version