पंतप्रधान मोदींना सोल शांतता पुरस्कार जाहीर

पंतप्रधान मोदींना सोल शांतता पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा सोल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. सोल शांतता पुरस्कार सांस्कृतिक संस्थेनं आज, बुधवारी पुरस्काराची घोषणा केली. यावेळी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं संस्थेनं कौतुक केलं आहे.

१०० सदस्यांमधून निवड 

सोल शांतता पुरस्कारासाठी जगभरातील १०० हून अधिक व्यक्तींच्या नावाचा विचार झाल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष चो चुंग-हू यांनी दिली. या निवड समितीत १२ सदस्यांचा समावेश होता. या पुरस्कारासाठी अनेक आजी-माजी राष्ट्राध्यक्ष, राजकीय नेते, उद्योगपती, अध्यात्मिक गुरु, पत्रकार, कलाकारा, खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या कामगिरीचा विचार झाला. यातून मोदींचं नाव पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आलं. मोदी यांची निवड अगदी योग्य असल्याचं निवड समितीनं म्हटलं. सोल शांतता पुरस्काराचे ते १४ वे मानकरी आहेत.

First Published on: October 24, 2018 11:42 AM
Exit mobile version