टेलिप्रॉम्पटर नंतर आता बेटी बचाव, बेटी पटाव….पंतप्रधान मोदींना झालयं तरी काय? व्हिडीओ व्हायरल

वर्ल्ड इकॉनॉनिक फोरमच्या व्हर्च्युअल फोरममध्ये संबोधित करताना पंतप्रधान मोदी अचानक थांबले होते. त्यावेळी त्यांच्यासमोरील टेलिप्रॉमप्टर बंद पडल्याने त्यांची फजिती झाल्याचा दावा करत विरोधक त्यांना ट्रोल करत आहेत. याचदरम्यान, ब्रम्हा कुमारी आयोजित एका कार्यक्रमात मोदी नागरिकांना संबोधित करतेवेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव, असे म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मोदींच्या एक शब्द चुकीचा बोलल्याने त्या घोषणेचा अर्थच बदलला. यामुळे नेटकऱ्यांनी मोदींना पुन्हा ट्रोल केले असून आज पुन्हा टेलिप्रॉमप्टर बंद पडला का असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. या घटनेमुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत आले असून त्यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले आहे.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी मोदींचा हा व्हिडीओ टि्वट केला आहे. टेलिप्रॉमप्टर वाचतानाही काय बोलून गेलात थोडी तरी लाज बाळगा अशी कॅप्शन या टि्वटखाली त्यांनी पोस्ट केली आहे.

दरम्यान ब्राम्हा कुमारी आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर भाष्य केले. तसेच राणी लक्ष्मीबाई, वीरांगना झलकारीबाई ते अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, राणी चेन्नमा, मांतगिनी हाजरा, यांच्यासह भारतासाठी थोर कार्य करणाऱ्या स्त्रियांचेही स्मरण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

 

First Published on: January 20, 2022 7:06 PM
Exit mobile version