स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी मोदीनी मागवल्या जनतेकडून सूचना

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी मोदीनी मागवल्या जनतेकडून सूचना

पंतपधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन भाषण करणार आहेत. देशाला उद्देशून मोदी भाषण करणार असून या भाषणासाठी पंतप्रधानांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे हे दुसरे पर्व असून या पर्वातील पहिला सातंत्र्य दिन अधिक खास बनवण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेचे मुद्दे आपल्या भाषणातून मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुशंगाने पंतप्रधानांनी सूचना पाठवण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

ओपन फोरमवर सूचना नोंदवू शकता

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माझ्या भाषणात तुमच्या अमूल्य सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी मी आतुर आहे. माझ्या माध्यमातून तुमचे विचार देशातील १३० कोटी जनतेपुढे जाणार आहेत. ‘नमो अॅपवर या सूचनांसाठी खास ओपन फोरमतयार करण्यात आला असून तिथे तुम्ही तुमच्या सूचना नोंदवू शकणार आहात‘, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये नसूद केले आहे. ‘नमो अॅपनरेंद्र मोदी यांचे अधिकृत अॅप असून हे अॅप प्लेस्टोअरमधून फ्री डाउलोड करता येऊ शकते. यादी जनतेने नोंद घ्यावी.


हेही वाचा – १५ ऑगस्टला अक्षय, जॉन, प्रभास यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार


 

First Published on: July 19, 2019 6:24 PM
Exit mobile version