Narendra Modi : सगळ्यांनाच याचा पश्चात्ताप होईल…, का म्हणाले पंतप्रधान मोदी असं?

Narendra Modi : सगळ्यांनाच याचा पश्चात्ताप होईल…, का म्हणाले पंतप्रधान मोदी असं?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आता काही दिवसांवरच आले आहे. आणि या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत समोर आली आहे. एका खासगी वृत्तसंस्थेने ही मुलाखत घेतली आहे. इलेक्टोरल बॉण्ड्स योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. या इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांबाबत विरोधकांनी फारच चुकीच्या गोष्टी पसरवल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला आहे. वास्तविक, या बॉण्ड्समुळेच राजकीय पक्षांना मिळणारे पैसे कुठून आले, हे कळतं, असंही त्यांनी सांगितलं. (India again pushed towards black money Narendra Modi on scrapping of electoral bonds scheme says everyone will regret it)

पुन्हा एकदा काळा पैसा ?

इलेक्टोरल बॉण्ड बाबत पंतप्रधान म्हणाले की, ही योजना रद्द केल्याने देशाला पुन्हा एकदा काळ्या पैशाचा धोका आहे. निवडणुका काळ्या पैशापासून मुक्त व्हाव्यात म्हणून इलेक्टोरल बॉण्डची योजना आणण्यात आली होती. मात्र, ही योजना रद्द केल्याने पुन्हा एकदा काळ्या पैशाची वाढ होण्याची भीती आहे. हे देशासाठी धोकादायक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या योजनेला विरोध करणारे पुढे यामुळेच पस्तावतील, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – PM Narendra Modi : ईडी आणि अन्य केंद्रीय यंत्रणांचे काम योग्यच; पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

या योजनेबद्दल विरोधकांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. वास्तविक, या योजनेचा उद्देश काळ्या पैशांवर अंकुश लावणे हा होता. पण विरोधी पक्षाला नको आहे. त्यामुळे ते केवळ आरोप करत आहेत. या इलेक्टोरल बॉण्डमुळे कोणत्या कंपनीने किती पैसे दिले, कोणत्या पक्षाला पैसे दिले, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणे शक्य आहे. यापूर्वी अशी माहिती मिळणे कधीच शक्य नव्हते. त्यामुळेच माझं हे म्हणणं आहे की, जेव्हा विरोधक शांतपणे आणि इमानदारीने हा विचार करतील तेव्हा सगळ्यांनाच पश्चात्ताप होईल. पैसे देण्याची माहिती सार्वजनिक होण्यावरून जे गदारोळ करत आहेत, त्यांना नंतर पश्चात्ताप होईल. पंतप्रधान पुढे म्हणाले की, तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर ज्या 16 कंपन्यांनी इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून निधी दिला, त्यातील केवळ 37 टक्के निधी भाजपाला मिळाला आहे. तर उर्वरित 63 टक्के रक्कम ही विरोधकांना मिळाली आहे. (India again pushed towards black money Narendra Modi on scrapping of electoral bonds scheme says everyone will regret it)

हेही वाचा – Gandhi VS Modi : इलेक्टोरल बाँण्ड सर्वात मोठा खंडणी घोटाळा आणि नरेंद्र मोदी…; राहुल गांधींचा हल्लाबोल

यापूर्वी देखील निवडणुकीत राजकीय पक्षांना निधी मिळत होता, पण त्याचा काहीच हिशोब ठेवला जात नव्हता. आणि काळ्या धनाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जात होता. मात्र, या निवडणूक रोख्यांमुळे पैशाचा स्रोत कळू शकत होता. वास्तविक, राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी अनेक लोक चेक देण्यास नकार देतात. कारण यामुळे त्यांची ओळख समोर येऊ शकते. आणि मग ज्यांना देणगी दिली असेल त्यांचे विरोधक पुन्हा संबंधित कंपनीकडे जातील, अशी भीती असते. हा सगळा गोंधळ होऊ नये यासाठी इलेक्टोरल बॉण्ड्सची योजना आणण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (India again pushed towards black money Narendra Modi on scrapping of electoral bonds scheme says everyone will regret it)


Edited by – Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 15, 2024 9:20 PM
Exit mobile version