घरदेश-विदेशGandhi VS Modi : इलेक्टोरल बाँण्ड सर्वात मोठा खंडणी घोटाळा आणि नरेंद्र...

Gandhi VS Modi : इलेक्टोरल बाँण्ड सर्वात मोठा खंडणी घोटाळा आणि नरेंद्र मोदी…; राहुल गांधींचा हल्लाबोल

Subscribe

इलेक्टोरल बाँण्ड हा सर्वात मोठा खंडणी घोटाळा आहे आणि मोदी त्याचे मास्टरमाइंड आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : निवडणूक रोखे योजनेबाबत विरोधी पक्ष ‘खोटे पसरवत आहेत’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यांनी असेही म्हटले की, निवडणुकीतील काळ्या पैशाला आळा घालणे हा इलेक्टोरल बाँण्ड योजनेचा उद्देश होता, मात्र विरोधकांना आरोप करून पळ काढायचा आहे, असे मोदींनी म्हटले. मात्र मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. पकडले गेल्यामुळे मोदी मुलाखत देत आहेत. पण इलेक्टोरल बाँण्ड हा सर्वात मोठा खंडणी घोटाळा आहे आणि मोदी त्याचे मास्टरमाइंड आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul Gandhi alleged that Electoral Bond is the biggest extortion scam and Narendra Modi is its mastermind)

नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, इलेक्टोरल बाँण्डमध्ये नाव आणि तारीख महत्त्वाची आहे. बाँड कधी दिले त्यांचे नाव आणि तारीख पाहिल्यावर कळेल की घोटाळा झाला आहे. आधी तपास यंत्रणा कारवाई करतात आणि त्यानंतर लगेच पैसे मिळतात आणि कारवाई थांबते. ही शुद्ध फसवणूक आहे. मोदी पकडले गेले आहेत, त्यामुळे ते मुलाखत देत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Narendra Modi : काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे युवा मतदारांचे सर्वात मोठे नुकसान; मोदींचा हल्लाबोल

इलेक्टोरल बाँण्डबाबत मोदी काय म्हणाले? (Modi What did say about electoral bonds?)

दरम्यान, एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला की, इलेक्टोरल बाँण्डवरील निर्णय चुकीचा होता का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराचा मुद्दा बराच काळ गाजत आहे. निवडणुकीतील खर्च कोणीही नाकारू शकत नाही. सर्वच पक्ष निवडणुकीच्या देणग्या घेतात. परंतु काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आपण काही प्रयत्न करावेत, अशी माझी इच्छा होती. इलेक्टोरल बाँण्डवर उपाय सापडला आणि त्याचे संसदेत कौतुकही झाले. काळा पैसा संपवण्यासाठी आम्ही मोठ्या चलनी नोटांवर बंदी घातली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक देणगीसाठी 20,000 रुपयांची मर्यादा निश्चित केली, मात्र आम्ही 2,500 रुपये केले, कारण आम्हाला पैशामध्ये व्यवहार नको होते, असे मोदींनी म्हटले.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -