मोदींनी पाठवलेले ५ लाख खात्यात जमा, अन् उडाला गोंधळ

मोदींनी पाठवलेले ५ लाख खात्यात जमा, अन् उडाला गोंधळ

अनेकदा आपल्या एका चुकीमुळे बँका खात्यातील पैसे चुकून दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. या एका चुकीमुळे तुम्हाला सतत बँकेत फेऱ्या माराव्या लागतात. मात्र ही एक चुक तुम्हाला किंवा काही वेळा बँकेला देखील भारी पडू शकते. कारण असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहारमधील बँकेकडून एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये चुकून ५ लाख रुपये ट्रान्सफर झाले. यानंतर बँकेने हे पैसे चुकून ट्रान्सफर झाल्याचे सांगत ते पैस परत करण्याची विनंती संबंधीत व्यक्तीला केली. मात्र त्या व्यक्तीचे पैसे परत करण्यास नकार देत बँकेला एक भन्नाट कारण सांगितले आहे.

बँकेला उत्तर देताना व्यक्ती म्हणाला की, हे पैसे मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवले आहेत. म्हणून ते मी पुन्हा परत करु शकत नाही. या व्यक्तीचे कारण ऐकून बँक कर्मचारी देखील चक्रावले आहेत.

बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील मानसी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील बख्तियारपुर गावतील रहिवासी रंजीत दास यांच्या बँक खात्यामध्ये खगडिया ग्रामीण बँकेच्या चुकीमुळे जवळपास ५.५ रुपये ट्रान्सफर झाले होते. यानंतर बँकेने रंजीत दास यांना कायदेशीर नोटीस पाठवत बँकेला पैसे पुन्हा परत करण्याचे आदेश दिलेत. मात्र रंजीत दास यांनी हे पैसे मला पंतप्रधान मोदींनी पाठवले असल्याचे सांगत बँकेला पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

यावर बोलताना रंजीत दास म्हणाले की, मार्च महिन्यात माझ्या बँक खात्यात पैसा आल्याचे पाहून मी खूप आनंदी झालो होतो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक बँक खात्य़ात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मला वाटले, पंतप्रधानांच्या आश्वासनानंतर माझ्या अकाऊंटमध्ये खरंच मोंदींनी पहिला हप्ता पाठवला. मी आता ते सर्व पैसे खर्च करु टाकले. आत्ता माझ्या खात्यात एकही रुपयाही नाही.

यावर मानसी पोलिस ठाण्यात प्रभारी दीपक कुमार म्हणाले. “खगडिया ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीनंतर आम्ही रंजीत दास यांना अटक केली आहे. या प्रकरणातील पुढील तपास सध्या सुरु आहे.


 

First Published on: September 15, 2021 8:30 AM
Exit mobile version