भाजपा मुख्य कार्यालयाच्या विस्ताराचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींनी दिली ‘ती’ माहिती…

भाजपा मुख्य कार्यालयाच्या विस्ताराचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींनी दिली ‘ती’ माहिती…

नवी दिल्लीत आज भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयाच्या विस्ताराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमातील आपल्या भाषणाआधी या कार्यालयाचे बांधकाम करणाऱ्या सर्व कामगारांची भेट घेतली. त्यावेळी मोदींबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुरली मनोहर जोशी यासारखे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धार्मिक विधी पार पडल्या. (PM Modi Slams Opposition Said For The First Time In 7 Decades Such An Action Is Being Taken Against Corrupts)

मुख्य कार्यालयाच्या विस्ताराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी कार्यालयाचा विस्तार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. या सर्व विस्तार आणि प्रगतीचा आत्मा हा कार्यकर्ताचा आहे. हा विस्तार केवळ कार्यालयाचा नसून एका सामान्य कार्यकर्त्याच्या स्वप्नांचा विस्तार आहे. मोदींनी जनसंघाच्या स्थापनेचा उल्लेख केला.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “1984 च्या दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठे बहुमत मिळाले. त्यावेळी वातावरण हे भावनिक पार्श्वभूमीमुळे भारावून गेलेले वातावरण होते. त्या वादळात आम्ही जवळजवळ संपलो होतो. मात्र आम्ही आशा सोडली नाही. आम्ही तळागाळात जाऊन काम केले. संघटना मजबूत केली”.

“काही दिवसांनी आपला पक्ष 44 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. हा प्रवास अथक आहे. हा प्रवास म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. कार्यकर्त्यांनी केलेलं समर्पण आणि संकल्पांचं सर्वोच्च शिखर गाठण्याचा हा प्रवास होता. हा प्रवास म्हणजे विचार आणि विचारधाराचे झालेला विस्तार दर्शवणारा आहे”, असेही मोदींनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाने पोलिसांना दिले चौकशीचे आदेश

First Published on: March 28, 2023 9:32 PM
Exit mobile version