Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाने पोलिसांना दिले चौकशीचे आदेश

संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाने पोलिसांना दिले चौकशीचे आदेश

Subscribe

ठाकरे गटाच्या उपनेच्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महिला आयोगाने या प्रकरणी शिरसाट यांची चौकशी करुन पुढील 48 तासांत पोलिसांनी अहवाल देण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजीनगर पोलिसांना दिले आहेत.

ठाकरे गटाच्या उपनेच्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महिला आयोगाने या प्रकरणी शिरसाट यांची चौकशी करुन पुढील 48 तासांत पोलिसांनी अहवाल देण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजीनगर पोलिसांना दिले आहेत. काही तासांपूर्वी सुषमा अंधारे यांनी बीडच्या परळीमधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिरसाठ यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी हे आदेश दिले आहेत. (rupali chakankar order to sambhajinagar police over sanjay shirsat sushma andhare case)

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलेचा अपमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही महिलेबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर होणे ही गंभीर बाब आहे याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना देण्यात आले आहेत. तसेच, या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती. त्याबाबतची तक्रार महिला आयोगाकडे सुषमा अंधारे यांनी दाखल केली आहे.

नेमके काय म्हणाले संजय शिरसाट?

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. ‘ती बाई सगळेच माझे भाऊ आहेत म्हणते…. सत्तार माझेच भाऊ आहेत, भुमरे पण भाऊ… पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती…’ अशी अश्लाघ्य आणि हीन टीका संजय शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर केली होती.

तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार – अंधारे

दरम्यान, याप्रकरणी सुषमा अंधारे तक्रार दाखल करण्यासाठी परळी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. मात्र त्यावेळी पोलिसांनी अंधारेंची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यावर सुषमा अंधारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होत नाही. पोलीस कर्मचारी वरिष्ठांना विचारून घेतो असे उत्तर देताहेत. इथे महिला किती सुरक्षित आहेत? देवेंद्रजी आपण याकडे लक्ष द्याल का की हे सगळे आपल्याच आशीर्वादाने चालू आहे?” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.


हेही वाचा – देश तुमच्या *** माल आहे का? निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका

- Advertisment -