सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘CoWIN Global Conclave’ला संबोधित करणार

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘CoWIN Global Conclave’ला संबोधित करणार

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'CoWIN Global Conclave'ला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे सोमवारी ‘कोविन ग्लोबल कॉन्क्लेव’ (CoWIN Global Conclave)ला संबोधित करत आपले विचार मांडणार आहेत. यानिमित्ताने भारत कोरोनासोबत रोखण्यासाठी कोविन प्लेटफॉर्मला एका डिजिटल पब्लिक गुडच्या रुपात लाँच करणार आहे.

कॅनडा, मॅक्सिको, नायजेरिया आणि पनामासह जवळपास ५० देशांनी आपल्या लसीकरण मोहिमेसाठी कोविन अॅपमध्ये रस दाखवला आहे आणि भारत ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ विनामूल्य शेअर करण्यास तयार झाले आहे. याबाबत एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी माहिती दिली.

कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे सशक्त गटाचे अध्यक्ष डॉ. आरएस शर्मा म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना सॉफ्टवेअरचे एक ‘ओपन सोर्स’ आवृत्ती विकसित करावे आणि यामध्ये रुची असणाऱ्या कोणत्याही देशाला ते विनामूल्य उपलब्ध करून द्यावे,’ असे निर्देश दिले आहे.

शर्मा पुढे म्हणाले की, ‘कोविन अॅप इतके लोकप्रिय झाले आहे की, अशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिकाचे जवळपास ५० देशांनी कोविन अॅपमध्ये रुची दाखवत आहे. तर दुसरे सार्वजनिक आरोग्य समिट २०२१ संबोधित करत होते. याचे आयोजन भारतीय उद्योग परिसंघने (सीआयआय) केले होते. जगभरातील आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या तज्ञांची जागतिक परिषद ५ जुलै रोजी डिजिटल स्वरुपात आयोजित केली जाईल आणि या कार्यक्रमात यंत्रणा कशी काम करते हे भारत सांगेल.’


हेही वाचा – लिंचिंगमध्ये सामील असलेले लोकं हिंदुत्व विरोधात – मोहन भागवत


 

First Published on: July 4, 2021 10:52 PM
Exit mobile version