PM Modi Diwali: नौशेरानं प्रत्येक कारस्थानाला उधळून लावलं, पंतप्रधान मोदींकडून जवानांच्या शौर्याचं कौतुक

PM Modi Diwali: नौशेरानं प्रत्येक कारस्थानाला उधळून लावलं, पंतप्रधान मोदींकडून जवानांच्या शौर्याचं कौतुक

PM Modi Diwali: नौशेरानं प्रत्येक कारस्थानाला उधळून लावलं, पंतप्रधान मोदींची जवानांच्या शौर्याचं कौतुक

दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील जवानांची भेट घेतली. यावेळी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना पंतप्रधान मोदींनी सलाम करत श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदींनी यावेळी जवानांना संबोधित करत नौशेरानं प्रत्येक कारस्थानाला उधळून लावल असं प्रतिपादन केलं आहे. तसेच नौशेरा सेक्टरमधील तैनात जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आमचे जवान हे भारत मातेचे रक्षक आहेत. आपल्या जवानांमुळे देशातील जनता शांतपणे झोपू शकते. प्रत्येक सण-समारंभ शांततेत साजरा करु शकतो.


“नौशेरामध्ये शांतता बिघडवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. मात्र जवानांनी प्रत्येक युद्ध, कट-कारस्थानाला चोख प्रत्युत्तर दिले. नौशेराने स्वातंत्र्यानंतर शत्रूंनी या भागावर नजर ठेवली आहे. पण मला आनंदा आहे की, नौशेराच्या वीरांच्या शौर्यासमोर सर्व कारस्थानं अपयशी ठरली आहेत. भारतीय सैन्याची ताकद काय असते, याचा अंदाज शत्रूला सुरुवातीच्या दिवसांमध्येच आला होता.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षरित्या उत्तर दिले.

“सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी नौशेरातील ब्रिगेडने जी भूमिका बजावली, त्यामुळे संपूर्ण देश अभिमानाने उंचावला. पूर्वी सुरक्षा दलांसाठी संरक्षण उपकरणे आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे लागायची. परंतु जुने मार्ग संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वावलंबी होणे. सीमेला लागून असलेल्या भागांशी संपर्क सुधारला आहे. लडाख असो, अरुणाचल प्रदेश असो, जैसलमेर असो, अंदमान निकोबार बेटे असोत. यामुळे आमची तैनाती क्षमता सुधारली आहे.” अस पंतप्रधान मोदी म्हणाले.

“देशाच्या सुरक्षेत महिलांची भूमिका नवीन आयामांना स्पर्श करणारी आहे. आता महिलांना लष्करात कायमस्वरूपी कमिशन मिळत आहे. लष्करी संस्थांची दारे आता महिलांसाठी खुली झाली आहेत. संरक्षण बजेटच्या सुमारे ६५ टक्के देशांतर्गत खरेदीवर खर्च केला जात आहे. आज अर्जुन रणगाडे देशात बनवले जात आहेत, तेजससारखी विमानेही देशात तयार होत आहेत. विजयादशमीच्या दिवशी ७ ‘संरक्षण कंपन्या’ राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


 

First Published on: November 4, 2021 2:08 PM
Exit mobile version