Pm Modi Visit Europe : पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर; युक्रेन-रशिया युद्धावर होणार चर्चा

Pm Modi Visit Europe : पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर; युक्रेन-रशिया युद्धावर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2022 मधील पहिल्या विदेश दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाले. 2 ते 4 मे हे तीन दिवस मोदी युरोप दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ते युरोपीय देश जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. आज ते बर्लिन येथे पोहोचतील आणि प्रथम जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतील आणि बर्लिनमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील.

यानंतर 3 मे रोजी ते इंडो-नॉर्डिक परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर ते डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये भारतीयांना संबोधितही करतील. अखेर पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान युक्रेनबाबत चर्चा होऊ शकते.

तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझा युरोप दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा युरोपसमोर अनेक आव्हाने आहेत. भारताच्या शांतता आणि समृद्धीमध्ये महत्त्वाचे भागीदार असलेल्या आमच्या युरोपियन भागीदारांसोबत सहकार्याची भावना मजबूत करण्याचा माझा मानस आहे.’

जर्मनीमध्ये भारतीयांना करणार संबोधित

जर्मनीपासून मोदींच्या तीन दिवशीय युरोप दौऱ्याला सुरुवात होईल, यावेळी ते जर्मनीच्या चॅन्सलसलोबत मोदींची द्वीपक्षीय चर्चा होणार आहे. यावेळी दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. भारत आणि जर्मनी इंटर गर्व्हन्मेंटल कन्सल्टेंशनच्या सहाव्या फेरीची ही चर्चा महत्त्वाची मानली जाते.

जर्मनीनंतर मोदी डेन्मार्कसाठी रवाना होतील, डेन्मार्कमध्ये भारत आणि नॉर्दिक कराराची दुसरी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत करारासंबंधी वेगवेगळ्या अनुशंगाने चर्चा होणार आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजकीय संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोन्ही देशाचे प्रमुख एकमेकांची भेट घेणार आहे. या भेटीत भविष्यातील राजकीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या रणनितीवर चर्चा होणार आहे.

युरोप खंडात भारतीय वंशाच्या 10 लाखांहून अधिक लोक राहतात. त्यापैकी मोठ्या संख्येने जर्मनीमध्ये राहतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी येथे भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करणार आहेत.


…तर चार तारखेपासून ऐकणार नाही, दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणार, राज ठाकरेंचा इशारा

First Published on: May 2, 2022 8:15 AM
Exit mobile version